Oplus_131072 कोपरगाव शहर ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्
कोपरगाव शहर ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा राज्याचा निकाल सोमवार (27 मे) रोजी ऑनलाइन जाहीर झाला आहे.यामध्ये शिरसगाव येथील श्री गुरुदत्त इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा निकाल शंभर टक्के लागला असून शाळेने 100 टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.यात
लाड़ सिद्धी विनोदकुमार हिने सर्वाधिक 95 टक्के टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला तर द्वितीय क्रमांक संकेत भाऊसाहेब गुंड 94 टक्के व तृतीय क्रमांक कोळसे कल्याणी अजय 93.40 टक्के मिळाले व एकूण 52 पैकी 12 विद्यार्थी 90 टक्के व 30 विद्यार्थी 80 टक्के व 10 विद्यार्थी 70 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाले. ग्रामीण भागात कोणत्याही ट्युशन सुविधा उपलब्ध नसताना केवळ शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली व स्वतःच्या मेहनतीने सदर परीक्षेत शाळेचे एकूण 52 विद्यार्थी चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याने शाळेचे संस्थापक केशवराव भवर, संचालक स्वप्नील भवर, प्राचार्य दिपक चौधरी आदी सह शिक्षण प्रेमी पालकांनी विद्यार्थ्यांचे व सर्व शिक्षकांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
COMMENTS