Homeताज्या बातम्यादेश

अवघ्या 100 तासात बनवला 100 किलोमीटरचा रस्ता

NHAI चा आणखी एक विश्वविक्रम

उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात, क्यूब हायवेद्वारे गाझियाबाद-अलिगड राष्ट्रीय द्रुतगती मार्ग सहा पदरी करण्याचे काम L&T च्या सहकार्याने सुर

सातार्‍यात सापडली गुप्त होणारी मानवी कवटी; जिल्हा रुग्णालयातील अधिकार्‍यांना डोकेदुखी
टू-व्हीलर ब्रँड लॅम्ब्रेटा 2023 मध्ये भारतात पुनरागमन करणार आहे.
तीन चाकांची भन्नाट स्कूटर

उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात, क्यूब हायवेद्वारे गाझियाबाद-अलिगड राष्ट्रीय द्रुतगती मार्ग सहा पदरी करण्याचे काम L&T च्या सहकार्याने सुरू आहे. यावेळी एनएचएआयने अवघ्या 100 तासात 100 किमीचा रस्ता तयार करून अनोखा विश्वविक्रम केला आहे. एनएचएआयने 100 तासांमध्ये गाझियाबाद ते अलीगढ दरम्यान हा रस्ता बनवला आहे. काल 19 मे रोजी एनएचएआय टीमने हे यश साजरे केले. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. गाझियाबाद ते अलीगढ हे अंतर 126 किलोमीटर आहे. या संपूर्ण कामात दोन हजार मजुरांनी न थांबता काम केले. यापूर्वी 75 किलोमीटर लांबीचा रस्ता 100 तासांत बांधण्याचा जागतिक विक्रम होता. बुलंदशहरमधील गाझियाबाद-अलिगड नॅशनल एक्स्प्रेसवेच्या सहापदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बांधकामाधीन नवीन एक्स्प्रेस वेची छायाचित्रे शेअर करताना या विश्वविक्रमाची माहिती दिली. गाझियाबाद आणि अलीगढच्या दाट लोकवस्तीच्या प्रदेशांमधील वाहतूक दुवा म्हणून हा मार्ग महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, हा प्रकल्प उत्तर प्रदेशातील दादरी, गौतम बुद्ध नगर, सिकंदराबाद, बुलंदशहर आणि खुर्जा यासारख्या अनेक शहरांमध्ये पसरलेला आहे.  यासह गडकरी यांनी नमूद केले की, एक्सप्रेसवे हा व्यापारी मार्ग म्हणून महत्त्वाची भूमिका बजावतो. वस्तूंची वाहतूक सुलभ करतो आणि प्रदेशाच्या आर्थिक वाढीस हातभार लावतो. एनएचएआयशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, हे टार्गेट खूप मोठे होते. त्यासाठी 15 मे रोजी सकाळी 10 वाजता कामाला सुरुवात झाली आणि 19 तारखेला पहाटे 2 वाजता 100 तासांत सुमारे 100 किलोमीटरचा रस्ता तयार करण्यात आला, जो एक जागतिक विक्रम आहे. ज्या वेगाने काम सुरू आहे, ते पाहता गाझियाबाद ते अलीगढपर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग 34 या वर्षी नोव्हेंबरपर्यंत तयार होईल,

COMMENTS