Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापुरात 10 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

अत्याचार करून केली हत्या ; राज्यभरात संताप

कोल्हापूर : कोलकातामध्ये डॉक्टर महिलेची बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आल्यानंतर राज्यात बदलापूरमध्ये शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर अत्याचार क

भाजप नेते, माजी खासदार प्रताप दादा सोनवणे यांचे निधन
गौतमी पाटीलचे सिंधुदुर्गमधील कार्यक्रम रद्द
विनयभंग प्रकरणी अकोल्यातील भाजप नगरसेवकाला अटक

कोल्हापूर : कोलकातामध्ये डॉक्टर महिलेची बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आल्यानंतर राज्यात बदलापूरमध्ये शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या दोन घटनांवरून देशभरात संताप आणि उद्रेक सुरू असतानाच कोल्हापूरमध्ये दहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संबंधित मुलगी बुधवारी (21 ऑगस्ट) दुपारपासून बेपत्ता होती. पोलिसांच्या माहितीनुसार, कोल्हापूरच्या शिये गावातील रामनगर परिसरात ही घटना घडली आहे. पीडित 10 वर्षीय मुलगी बुधवार दुपारपासून (21 ऑगस्ट) बेपत्ता होती. तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला. पण रात्री उशीरापर्यंत ती सापडली नाही. अखेर गुरूवारी सकाळी गावालगतच्या एका शेतात तिचा मृतदेह आढळला. पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. या मुलीची हत्या करण्यापूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. त्यानुसार पोलिस आपल्या तपासाची चक्रे फिरवत आहेत. तूर्त मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. विशेष म्हणजे महायुतीचा गुरूवारी लाडकी बहीण कार्यक्रम वचनपूर्ती सोहळा कोल्हापूरमध्ये सुरू असतानाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे राज्यातील मुली आता सुरक्षित आहेत की नाहीत? हा पुन्हा एकदा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

COMMENTS