नवी दिल्ली ः केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 सादर केला. देशाला मजबूत विकास

नवी दिल्ली ः केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 सादर केला. देशाला मजबूत विकास आणि सर्वांगीण समृद्धीच्या मार्गावर नेण्याची विशेष संधी जनतेने आमच्या सरकारला दिली आहे असे त्या म्हणाल्या. पंतप्रधान आवास योजनेबाबत बोलताना केंद्रीय मंत्री म्हणाल्या की, पीएम आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत, 10 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीद्वारे एक कोटी शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या घरांच्या गरजा पूर्ण केल्या जातील. यामध्ये येत्या 5 वर्षांत 2.2 लाख कोटी रुपयांचे केंद्रीय वित्त सहाय्य समाविष्ट असेल. परवडणार्या दरात कर्जपुरवठा सुलभ करण्यासाठी व्याजात सवलत देण्याची तरतूद देखील यात प्रस्तावित आहे, असे त्या म्हणाल्या.
भाड्याच्या घरांबाबत बोलताना केंद्रीय मंत्री म्हणाल्या, औद्योगिक कामगारांसाठी मोठे गुंतवणूकदार आणि व्यवहार्यता अंतर निधी सहाय्यासह सार्वजनिक खासगी भागीदारीतून वसतिगृहाच्या प्रकारातील निवासस्थाने असलेली भाड्याच्या घरांची सुविधा पुरवण्यात येईल. निर्मला सीतारामन पुढे म्हणाल्या की, शहरांचा ’विकासाची केंद्रे’ म्हणून विकास करण्यासाठी केंद्र सरकार राज्यांसोबत काम करेल. आर्थिक आणि सार्वजनिक वाहतुकीचे नियोजन तसेच नगर नियोजन योजनांचा वापर करून शहरांच्या आसपासच्या परिसराचा सुव्यवस्थित विकास करून हे साध्य केले जाईल, असे केंद्रीय मंत्र्यांनी नमूद केले. 30 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या 14 मोठ्या शहरांसाठी अंमलबजावणी आणि वित्तपुरवठा धोरणासह वाहतुकीचे योग्य नियोजन असलेल्या विकास योजनांची घोषणा केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात केली. केंद्रीय वित्त मंत्र्यांनी सांगितले की, राज्य सरकारे आणि बहुपक्षीय विकास बँकांबरोबरच्या भागीदारीतून योग्य वित्तपुरवठ्यासह केंद्र सरकार 100 मोठ्या शहरांसाठी पाणीपुरवठा, सांडपाणी प्रक्रिया तसेच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि सेवांना प्रोत्साहन देईल. निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली की, फेरीवाल्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी पीएम स्वनिधी योजनेच्या यशाच्या आधारे पुढील पाच वर्षांमध्ये निवडक शहरांमध्ये 100 साप्ताहिक ’हाट’/आठवडे बाजार किंवा ’स्ट्रीट फूड हब’ विकसित करण्यासाठी दरवर्षी सहाय्य पुरवण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. उच्च मुद्रांक शुल्क आकारत असलेल्या राज्यांना दर कमी करण्यासाठी केंद्र सरकार प्रोत्साहित करेल; तसेच महिलांनी खरेदी केलेल्या मालमत्तेसाठी शुल्क कमी करण्याचा देखील विचार करेल, यावर केंद्रीय वित्त मंत्र्यांनी भर दिला.
पंप स्टोरेज धोरणाला चालना – वीज साठवणुकीसाठी उदंचन तत्वावर (पंप स्टोरेज) आधारित साठवण प्रकल्पांना चालना देण्यासाठी धोरण आणले जाईल आणि एकंदर ऊर्जा मिश्रणामध्ये परिवर्तनशील तसेच अखंडित, अशा अक्षय ऊर्जेच्या वाढत्या वाट्याचा अधूनमधून सुरळीतपणे समावेश करणे सुलभ होईल. देशात सौर घट आणि पॅनेलच्या उत्पादनातील वापरासाठी सूट देण्यात आलेल्या भांडवली वस्तूंच्या यादीचा विस्तार करण्याची घोषणा अर्थमंत्री सीतारामन केली. तसेच, 2024-25 च्या अर्थसंकल्पात त्यांना प्रदान करण्यात आलेल्या सीमा शुल्कातील सूट वाढवू नये, असे अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितले.
पारंपरिक सूक्ष्म आणि लघु उद्योगांना पाठबळ – ब्रास आणि सिरेमिकसह 60 उद्योग समूहातील पारंपारिक सूक्ष्म आणि लघु उद्योगांचे गुंतवणूक-श्रेणीचे ऊर्जा लेखापरीक्षण सुलभ केले जाईल. त्यांना स्वच्छ ऊर्जेकडे स्थलांतरित करण्यासाठी आणि ऊर्जा कार्यक्षमतेच्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी वित्तीय पाठबळ प्रदान केले जाईल, अशी घोषणा वित्तमंत्र्यांनी केली. तसेच अंतरिम अर्थसंकल्पातील घोषणेच्या अनुषंगाने, 1 कोटी कुटुंबांना दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळावी, यासाठी छतावर सौर ऊर्जा संयंत्रे बसवण्यासाठी पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजना सुरू करण्यात आली आहे.
COMMENTS