Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कराडच्या शासकीय औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाला 10 कोटीचा निधी देणार : ना. उदय सामंत

सातारा / प्रतिनिधी : कराड येथील शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहासाठी 5 कोटी रूपये आणि इनोव्हेशन केंद्रासाठी 5 कोटी रूप

निसर्गानुभव कार्यक्रमात निसर्गप्रेमींना 374 वन्यप्राण्यांचे दर्शन
जिल्हा कोषागार अधिकारी धनाजी शिंदे यांना मुंबईत उपसंचालक पदी पदोन्नती
राष्ट्रवादी काँग्रेसकडून 1 एप्रिल मोदीजींच्या विकासाचा जन्मदिवस म्हणून साजरा

सातारा / प्रतिनिधी : कराड येथील शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहासाठी 5 कोटी रूपये आणि इनोव्हेशन केंद्रासाठी 5 कोटी रूपये असे एकूण 10 कोटी रुपये देणार असल्याचे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कराड येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
कराड येथील शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषदेकडून ‘नॅक ए प्लस’ मानांकन मिळाले. याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. बी. बुराडे, नॅक समन्वयक प्रा. मनोज सरडे, प्र. प्रबंधक दिलीप कांबळे यांचा सत्कार मंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय पुणेचे सहसंचालक डॉ. डी. व्ही. जाधव उपस्थित होते. मंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच शासकीय औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाच्या एकूण कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले.
ना. उदय सामंत म्हणाले, कराड येथील शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील प्रवेशासाठीच्या 100 टक्के जागा भरल्या आहेत. एमफार्मसीसाठी 30 जागा भरल्या जाणार आहेत. याबाबत शासनाकडे मागणी केली असून येत्या काही दिवसात या जागा वाढवण्यात येणार आहेत. दरम्यान, पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रम ठरवण्याची समितीतील एक क्रमांकाचे व 8 क्रमांकाचे मानांकन या कॉलेजच्या विद्यार्थ्यांस मिळाले आहे. पुढच्या 50 मधील आठ विद्यार्थी कराडच्या औषधनिर्माणशास्त्र कॉलेजचे आहेत. ही अभिमानाची बाब आहे, असेही कौतुक ना. सामंत यांनी केले.
यंदा या महाविद्यालयात 100 टक्के प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सध्या मुलींना राहण्यासाठी वसतीगृह कमी पडत आहे. त्यामुळे 50 विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह उभारण्यासाठी 5 कोटी रूपये तातडीने मंजूर केले आहेत तर महाविद्यालयात प्रयोगशाळेसाठी 5 कोटी असे 10 कोटी रूपये मंजूर केले आहेत. तसेच एमफार्मसीसाठी एकूण 30 जागा येत्या काही दिवसांमध्ये वाढवणार आहे.
मंत्री महोदयांनी दिली शाब्बासकीची थाप
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचा कराड दौरा नियोजित नव्हता. दरम्यान कोल्हापूर येथे नियोजित दौरा असल्यामुळे शासकीय औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालय ए प्लस मानांकन राज्यातील पहिले शासकीय महाविद्यालय ठरल्यामुळे आवर्जून कराड येथे थांबून महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, सेवक, विद्यार्थी यांचा गौरव करून अभिनंदन करीत यासाठी अथक प्रयत्न करणार्‍यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप दिली.

COMMENTS