Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरीतून दहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपासाठी

यंदाचा ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात

राहुरी ः यंदाचा ऊस गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असून राहुरी तालुक्यातील जवळपास दहा लाख मेट्रिक टन उसाचे राहुरीतील खाजगी कारखान्यासह जिल्ह्यातील विवि

खर्डा आरोग्य केंद्र असून अडचण नसून खोळंबा
नगर शहर सहकारी बँकेसह 21 संस्थांच्या निवडणुका थांबल्या
जलसिंचनाचे योग्य नियोजन केल्यास परिसर समृद्ध होतो : सुवर्णा माने

राहुरी ः यंदाचा ऊस गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असून राहुरी तालुक्यातील जवळपास दहा लाख मेट्रिक टन उसाचे राहुरीतील खाजगी कारखान्यासह जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांनी ऊस गाळप केला आहे. दिवाळीनंतर सुरू झालेला हंगाम हा सर्वांनाच वेगवेगळ्या समस्याना सामोरे जाऊन हंगाम यशस्वी करण्यासाठी गेला. नगर जिल्ह्यातील 22 साखर कारखाने यंदाच्या हंगामात सुरू राहिले. यात 13 सहकारी तर नऊ खाजगी साखर कारखान्यांचा समावेश राहिला.
राहुरी तालुक्यात यंदा उसाचे उत्पादन 10 लाख मॅट्रिक टनहून अधिक झालेले होते. तालुक्यातील एकमेव खाजगी प्रसाद शुगर्सने आज अखेर पाच लाख 55 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. तर पाच लाख 63 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. प्रसाद शुगर कारखान्याचा सरासरी साखर उतारा 9.85 टक्के इतका असून सध्या प्रसाद शुगर्स कारखान्याचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आलेला आहे. राहुरी तालुक्यातील जवळपास दहा लाख मेट्रिक टन ऊस विविध साखर कारखान्यांनी आपापल्या कारखान्यात तोडून गाळप केला आहे. यंदाच्या वर्षी अशोक, संगमनेर, प्रवरा, मुळा व अन्य साखर कारखान्यांनी राहुरी येथील ऊस नेला आहे. अनेक साखर कारखान्यांनी शेतकर्‍यांना 2700 रुपयांपर्यंत पहिला हप्ता दिलेला आहे. मागील वर्षी झालेल्या बर्‍यापैकी पावसाने उसातचे उत्पादन चांगले झाले होते. यंदाच्या वर्षी उसाच्या शेतीला कालव्यांचे आवर्तन कमी प्रमाणात मिळण्याचे संकेत प्राप्त होत आहेत , असे असताना यावर्षी 2024 मध्ये विविध हवामान विभागाकडून चांगल्या पावसाचे संकेत येत आहेत . त्यामुळे यंदाच्या वर्षी देखील उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

COMMENTS