1 जानेवारी रोजी महाराष्ट्र कोविंड मुक्त होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे 31 डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रातील 40 नेत्यांचे घोटाळे बाहेर काढू
1 जानेवारी रोजी महाराष्ट्र कोविंड मुक्त होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे 31 डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रातील 40 नेत्यांचे घोटाळे बाहेर काढून 1 जानेवारीपर्यंत महाराष्ट्र हा भ्रष्टाचार मुक्त होणार आहे. दिवाळी आज होणार, पण पाडवा एक जानेवारीला होणार आहे. अनिल देशमुखांनी वसुलीमधून जो पैसा लाटला, तो काही कंपनीमध्ये गुंतवणूक केला. परंतु जो हिस्सा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना दिला आहे, तो पुढे यायचा आहे.मी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना चॅलेंज करतो की त्यांनी शंभर मानहानीचे दावे जरी दाखल केले तरी महाराष्ट्र हा घोटाळे मुक्त करूनच राहणार, अशा शब्दात भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे. मुंबईमध्ये ते बोलत होते.
COMMENTS