वर्धा प्रतिनिधी- हिंगणघाट(Hinganghat) शहरात चक्क गटाराच्या पाण्यात भाजीविक्रेता भाजी धुवून त्याची विक्री करत असल्याचा अत्यंत किळसवाणा प्रकार कॅमेऱ्
वर्धा प्रतिनिधी- हिंगणघाट(Hinganghat) शहरात चक्क गटाराच्या पाण्यात भाजीविक्रेता भाजी धुवून त्याची विक्री करत असल्याचा अत्यंत किळसवाणा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अशाप्रकारचं कृत्य करुन भाजी विक्रेता हा नागरिकांच्या आरोग्याशी सर्रास आणि राजरोसपणे खेळत असल्याचं आता उघड झालं आहे. या व्हिडिओमधील घटना हिंगणघाट शहरातील मनसे चौक(MNS Chowk) येथील आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर आता प्रशासन काय कारवाई करणार? असा सवाल आता नागरिक विचारत आहेत.
COMMENTS