अकोले/प्रतिनिधी-अकोले तालुक्यातील एका प्रतिष्ठित व्यक्तीला हनी ट्रॅपच्या जाळ्यात गुंतवून त्याचा अश्लील व्हिडिओ बनविला आणि त्याला बदनामीची धमकी देत द
अकोले/प्रतिनिधी-अकोले तालुक्यातील एका प्रतिष्ठित व्यक्तीला हनी ट्रॅपच्या जाळ्यात गुंतवून त्याचा अश्लील व्हिडिओ बनविला आणि त्याला बदनामीची धमकी देत दोन लाखाची खंडणी मागणार्या महिलेसह एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या प्रतिष्ठिताने धाडसाने पुढे येत अकोले पोलिसांत तक्रार दिल्याने या महिलेचे बिंग फुटले.
अकोल्यात घडलेल्या घटनेतील तक्रारदार यांनी अकोले पोलिस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीनुसार गुन्ह्यातील आरोपी महिला व तिचे साथीदार यांनी दि. 11/06/2021 ते दि. 13/07/2021 रोजी 15.00 वाजता आरोपी महिला यांनी कटकारस्थान व संगनमत करुन तक्रारदार यांना शरीरसंबधाचे अमिष दाखवून त्यांच्यातील महिलेसोबत शरीरसंबध ठेवण्यास भाग पाडून त्याचा अश्लील व्हिडीओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी देत दोन लाख रुपयांची खंडणी मागितली. तक्रारदार यांनी आरोपी यांना पैसे न दिल्याने आरोपींनी तक्रारदार यांना मारहाण करुन व्हिडीओ क्लीप व्हायरल करण्याची धमकी देऊन या व्यक्तीच्या एटीएममधून 30 हजार रुपये बळजबरीने काढायला लावून पैसे काढल्यानंतर ते बळजबरीने तक्रारदार यांच्याकडून घेऊन अजून 1 लाख 70 हजार रुपयांची मागणी केली, अशा आशयाची तक्रार पोलिस स्टेशनला दाखल झाल्यानंतर पोलिसांनी लगेच तपासाची चक्रे फिरवली.
पोलिसांनी सापळा रचला
सहायक पोलिस निरीक्षक मिथुन घुगे यांनी तक्रारदार सांगत असलेल्या घटनाक्रमानुसार दोन पंचांना घेऊन व त्यांना घटनेची हकिगत समजावून सांगून तक्रारदार यांच्याकडे 500 रुपयांच्या 20 नोटा असे 10 हजार रुपये देऊन त्यांना सुगाव फाटा येथे जाऊन थांबण्यास सांगितले व तेथे पोलिसांनी पंचासमक्ष सापळा लावून एक महिला व रावसाहेब सटाले या पुरुष आरोपीला तक्रारदाराकडून 10 हजार रुपयांची खंडणी घेताना रंगेहाथ पकडले व गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी अकोले पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यात तीन आरोपी असून, त्यात दोन महिला व एक पुरुष आहे. यापैकी एक महिला आरोपी व तिच्या वाहनाचा चालक रावसाहेब सटाले यांना अटक करण्यात आली. अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना दि. 19 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
अटक असलेल्या आरोपींना विश्वासात घेऊन विचारपूस करण्यात आली असता त्यातील महिला आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. गुन्ह्यातील उर्वरीत आरोपींचा शोध सुरू असून या आरोपींनी आणखी किती व्यक्तींना अशा पध्दतीने लुबाडले याबाबतही तपास सुरू आहे. आरोपींना पकडण्याची कारवाई सहायक पोलिस निरीक्षक घुगे यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक डी. व्ही. साबळे, पोलिस नाईक बडे, आहेर, कोरडे, पोलिस कॉन्स्टेबल आनंद मैड, शेरमाळे, संदीप भोसले, महिला पोलिस कॉन्स्टेबल आहेर, थिटमे, पानसरे यांनी केली.
नागरिकांनी तक्रार द्यावी
नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता अशा प्रकारे शरीरसंबंधांचे आमीष दाखवून व अश्लिल व्हिडीओ बनवून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन लूट झाल्यास अथवा पैशांची मागणी केली असल्यास तात्काळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे.
COMMENTS