Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वामीराज कुलथे यांना राज्यस्तरीय युवा पत्रकार पुरस्कार घोषित

श्रीरामपूर (प्रतिनिधी ) येथील पत्रकार श्री स्वामीराज प्रकाश कुलथे यांना भूमी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्यतर्फे ' राज्यस्तरीय युवा पत्रकार पुरस्कार २०

एकतर्फी प्रेमातून मुलीला ठेवले डांबून ; नगरच्या एकाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल
केडगावमध्ये युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
मराठी नवीन वर्ष म्हणजेच ‘गुढी पाडवा’ याचं महत्व काय? पहा हा SPECIAL VIDEO | GUDI PADWA | LokNews24

श्रीरामपूर (प्रतिनिधी )

येथील पत्रकार श्री स्वामीराज प्रकाश कुलथे यांना भूमी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्यतर्फे ‘ राज्यस्तरीय युवा पत्रकार पुरस्कार २०२१ घोषित झाल्याची माहिती फौंडेशनचे संस्थापक, अध्यक्ष प्रा. कैलास पवार यांनी दिली.

भूमी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य सेवाभावी संस्था,महाराष्ट्र ही 02 ऑक्टोबर 2018 रोजी स्थापन झाली असून महात्मा गांधी यांच्या निरपेक्ष सेवेचा आदर्श ठेवत कार्यरत आहे. मराठी चित्रपट अभिनेत्री अलकाताई कुबल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विचारातून ही संस्था विविध सामाजिक, शैक्षणिक, कृषी, साहित्य, सहकार, प्रसारमाध्यमे, जलसंधारण, वृक्षारोपण आणि संवर्धन, महामारी, महापूर आणि संकटप्रसंगी आतापर्यन्त याक्षेत्रात भरीव योगदान देत आहे, लोकप्रबोधन, लोकशिक्षण यातही ह्या संस्थेने नेत्रदीपक कार्य केले आहे,करीत आहे अशी माहिती प्रा.कैलास पवार दिली.

स्वामीराज कुलथे हे पत्रकार क्षेत्रात कार्यरत असून, लोकपयोगी प्रकल्प राबवित असतात. ते  ‘साहित्य प्रबोधन मंच’चे कार्याध्यक्ष तर दैनिक स्नेहप्रकाश’ चे कार्यकारी संपादक म्हणून प्रभावीपणे जबाबदारी सांभाळत आहेत., गेल्या 28 वर्षांपासून ‘वर्ल्ड सामना’  दीपावली अंक प्रकाशित करतात., त्यांच्या पत्रकारिता व साहित्यिक योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.असे संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष प्रा. कैलास पवार यांनी सांगितले. संस्थेच्या मार्गदर्शिका अलकाताई कुबल, संस्था सचिव सौ. अनिता कैलास पवार,  माजी प्राचार्य टी. ई. शेळके, पुरस्कार समितीचे अध्यक्ष साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये, सदस्य आरोग्यमित्र भीमराज बागुल, पत्रकार बाबासाहेब चेडे यांनी आपल्या नावाची शिफारस करून पुरस्कारासाठी निवड केली आहे. लवकरच हा पुरस्कार संस्थेच्या कार्यक्रम सोहळ्यात प्रदान करण्यात येईल. 

कुलथे यांच्या या निवडीबद्दल खासदार सुजय विखे, आमदार राधाकृष्ण विखे पाटील, रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने, उपनगराध्यक्ष करण ससाणे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष संजय छल्लारे, शिवसेना नेते सुधीर वायखिंडे, माजी प्राचार्य टी. ई. शेळके, प्रा. डॉ. बाबुराव उपाध्ये, डॉ. शिवाजी काळे, पोपटराव पटारे, डॉ.राज जगताप, संगीता फासाटे, प्रकाश निफाडकर, सुरेश नागरे, गिरीश बिडकर, बाळासाहेब देवलालीकर, शेखर लोळगे यांनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS