स्वच्छ-जलशक्ती-हरित पर्यावरण २०२१ चा कोपरगावात शुभारंभ

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

स्वच्छ-जलशक्ती-हरित पर्यावरण २०२१ चा कोपरगावात शुभारंभ

पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण ही काळाची गरज ओळखून त्यात व्यक्तीगत आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून व्यापक सहभाग मिळत आहे.

आ. जगतापांचा कोट्यवधीचा भ्रष्टाचार…मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
सोमनाथ जंगम यांचा डॉक्टर ऑफ सोशल वर्क किताबाने सन्मान
रुग्णालयांवर ऑक्सिजन निर्मितीचे बंधन ; तिसर्‍या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाकडून तयारीचा आढावा सुरू

कोपरगाव शहर प्रतिनिधी : पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण ही काळाची गरज ओळखून त्यात व्यक्तीगत आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून व्यापक सहभाग मिळत आहे.पर्यावरण संवर्धन ही सामुदायिक जबाबदारी असून वृक्षारोपण आणि पालकत्व या माध्यमातून पर्यावरणाची जपणूक होते.याकरिता प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा असून पर्यावरणाच्या संवर्धनातून वसुंधरेच्या जपवणुकीत सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे. असे सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी सांगितले.
सूर्यतेज संस्था कोपरगाव वतीने स्वच्छ-जलशक्ती-हरित पर्यावरण अभियान – २०२१ चा शुभारंभ जागतिक पर्यावरण दिनानिमित्त चि.संस्कार, कु.शर्वरी या लहान मुलांचे शुभहस्ते वृक्षारोपण करुन करण्यात आला आहे.
आषाढी एकादशी-२००१ रोजी “सूर्यतेज” संस्था कोपरगाव ची स्थापना “उजळूया अंधार सारा” हे ब्रीद घेवून करण्यात आली आहे.सूर्यतेज संस्थापक सुशांत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली संस्थेच्या माध्यमातून गेल्या २० वर्षांच्या कालखंडात वही वाटप, विविध शिबीर-स्पर्धा,कला-नाट्य स्पर्धा,क्रीडा स्पर्धा, कोपरगाव फेस्टिव्हल, दीपावली-पाडवा घर तेथे रांगोळी स्पर्धा, मराठी भाषा दिवस, विविध आपत्कालीन काळात गरजूंना मदत असे विविध उपक्रमासह स्वच्छ भारत अभियान, जलशक्ती अभियान,वन महोत्सव,माझी वसूंधरा अभियान या माध्यमातून वृक्षारोपण आणि पालकत्व अभियान राबविण्यात येत असते. आत्तापर्यंत या उपक्रम अंतर्गत कोपरगाव,राहाता आणि वैजापूर तालुक्यात सुमारे ५० हजारचे पुढे रोपांचे मोफत वितरण,रोपण आणि पालकत्व दिले आहे.यात विविध ठिकाणी शोभेची झाडे रोपण केली असून तेथील सौंदर्यात भर पडली आहे.तसेच पर्यावरण युक्त, शुध्द हवेसाठी ऑक्सिजन देणारी झाडे कडूलिंब,वड,पिंपळ…या सारख्या झाडांचे रोपण करुन पालकत्व दिले आहे.
पर्यावरण दिनानिमित्त झालेल्या वृक्षारोपणात सूर्यतेजचे ॲड.महेशराव भिडे,अतुल कोताडे,विद्याप्रबोधिनीचे मुख्याध्यापक दत्तात्रय गवळी,शिशुविकास मंदिर च्या मुख्याध्यापिका सौ.सरिता कोर्हाळकर,आनंद टिळेकर यांचे सह सूर्यतेजचे सदस्य यांनी सहभाग घेतला आहे.

COMMENTS