स्मार्ट एलईडी पथदिवे बसविण्याच्या कामाची सुरुवात करावी – नगरसेवक डॉ.सागर बोरुडे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्मार्ट एलईडी पथदिवे बसविण्याच्या कामाची सुरुवात करावी – नगरसेवक डॉ.सागर बोरुडे

अहमदनगर प्रतिनिधी - स्थायी समितीच्या वतीने शहरात स्मार्ट एलईडी पथदिवे बसविण्याच्या निविदेला मंजुरी दिली असून महापालिका प्रशासनाने ठेकेदाराला क

नगरच्या एमआयडीसी परिसरातही हनी ट्रॅप…
शेवगावच्या बनावट सोने प्रकरणी 160 जणांना नोटिसा ;गोल्ड व्हॅल्युअर व कर्जदारांचा समावेश, म्हणणे मांडण्याचे पोलिसांचे आदेश
pathardi : गांजाची राखण करणाऱ्या दोन महिला पोलिसांच्या ताब्यात l LokNews24

अहमदनगर प्रतिनिधी –

स्थायी समितीच्या वतीने शहरात स्मार्ट एलईडी पथदिवे बसविण्याच्या निविदेला मंजुरी दिली असून महापालिका प्रशासनाने ठेकेदाराला कार्यारंभ आदेश लवकरात-लवकर दयावा व प्रभाग क्र.१ व ७ मधून स्मार्ट एलईडी पथदिवे बसविण्याच्या कामाचा सुरवात करावी अशी मागणी स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांच्याकडे निवेदनाद्वारे करताना स्थायी समितीचे सदस्य डॉ.सागर बोरुडे यांनी मागणी केली.

प्रभाग क्रमांक एक व सात हा एमआयडीसी जवळचा भाग असून, या परिसरातील नागरिकांना एमआयडीसी मध्ये नोकरीसाठी जावे लागते रात्री-अपरात्री कामावरून घरी येतानां अंधारामुळे विविध समस्यांना सामोरे जावे लागते व त्यामुळे या भागात भुरट्या चोर्‍या व लुटमारीचे प्रमाण वाढले आहे यासाठी प्रभाग क्रमांक एक व सात मधून नवीन स्मार्ट एलईडी पथदिवे बसवण्याचे काम या प्रभागातून सुरू करण्याची मागणी स्थायी समितीचे सदस्य डॉ.सागर बोरुडे यांनी निवेदनाद्वारे केली.

डॉ.सागर बोरुडे निवेदना द्वारे पुढे म्हणाले की,प्रभाग 1 व 7 हे सावेडी उपनगरातील विस्ताराने मोठे असलेले प्रभाग आहे.गेल्या अनेक दिवसापासून पथदिवे बंद आहे त्यामुळे परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले,याचाच फायदा घेत या प्रभागांमध्ये घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे तसेच महिलाच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.

COMMENTS