सीआरपीएफ जवानाचा सहकार्‍यांवर गोळीबारात 3 ठार

Homeताज्या बातम्या

सीआरपीएफ जवानाचा सहकार्‍यांवर गोळीबारात 3 ठार

रायपूर : छत्तीसगडच्या सीआरपीएफ जवानाने आपल्याच सहकार्‍यांवर गोळीबार केल्याची घटना घडली. सोमवारी पहाटे 3 वाजेच्या सुमाराला झालेल्या या घटनेत 3 जवान मृ

अखेर मुहूर्त ठरला; 7 मे पासून आष्टी ते अहमदनगर रेल्वे होणार सुरू
श्रीगोंदा नगरपालिकेतील नगरसेवकांची संख्या वाढणार
‘द फॅमिली मॅन’चा नवा विक्रम, जगातील चौथी सर्वाधिक लोकप्रिय वेब सीरीज l Lok News24

रायपूर : छत्तीसगडच्या सीआरपीएफ जवानाने आपल्याच सहकार्‍यांवर गोळीबार केल्याची घटना घडली. सोमवारी पहाटे 3 वाजेच्या सुमाराला झालेल्या या घटनेत 3 जवान मृत्यूमुखी पडले असून 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी जवानांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुकमा जिल्ह्यातील मराईगुडा येथील लिगम पल्ली सीआरपीएफ 50 बटालियन कॅम्पमध्ये ही घटना घडली. मध्यरात्री 3 वाजून 25 वाजण्याच्या सुमारास जवानाने हा गोळीबार केला आहे. रितेश रंजन या जवानाने मध्यरात्री 3 वाजून 25 वाजण्याच्या सुमारास आपल्या सहकारी जवानांवर गोळीबार केला आहे. या घटनेत 3 जवानांचा मृत्यू तर 4 जवान जखमी झाले आहेत. या जखमी जवानांवर तात्काळ भद्राचलम येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आरोपी जवान रितेश रंजनच्या गोळीबारात धनजी, राजीब मोंडल आणि राजमणी कुमार यादव यांचा मृत्यू झाला असून धनंजय केआर सिंह, धर्मेंद्र के.आर, धर्मात्मा कुमार आणि बग मलाया रंजन महाराणा हे जवान जखमी झाले आहेत.

COMMENTS