सावेडीतून महिलेच्या गळ्यातील गंठण धूम स्टाईलने पळवले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सावेडीतून महिलेच्या गळ्यातील गंठण धूम स्टाईलने पळवले

दुचाकीवरून घराकडे जाणार्‍या 41 वर्षीय महिलेच्या गळ्यातील 19 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी हिसकावून तोडून चोरून नेले.

वोट बँक वाचवण्यासाठी शेतकर्‍यांचा बळी ः अजित नवले
योगिता खेडकर व हर्षदा गरुड यांची वेटलिफ्टींग स्पर्धेसाठी निवड
आगडगाव : भैरवनाथ देवस्थानजवळ रविवारी दीड हजार किलो आंब्यांचा रस

अहमदनगर/प्रतिनिधी- दुचाकीवरून घराकडे जाणार्‍या 41 वर्षीय महिलेच्या गळ्यातील 19 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी हिसकावून तोडून चोरून नेले. ही घटना सावेडी येथील बीएसएनएल ऑफिसजवळ रविवारी दि. 27 जून रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. 

याबाबतची अधिक माहिती अशी की सविता गणेश शेलार (वय 41, राहणार रामकृष्ण कॉलनी, श्रीनिवास बंगला, बीएसएनएल ऑफिसजवळ, सावेडी) या काही कामानिमित्त गुलमोहर रोडवरील ब्युटीपार्लर येथे गेल्या होत्या. तेथील काम आटोपून त्यांच्या स्कूटरवरून घराकडे जात असताना बीएसएनएल ऑफिस जवळ आल्या असता त्यांच्या पाठीमागून मोटारसायकलवरून दोनजण आले व त्यांनी शेलार यांच्या स्कूटर जवळून त्यांची मोटारसायकल वेग कमी करून चालवली व अचानक मोटारसायकलवर पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील 19 ग्रॅम 920 मिली वजनाचे दोन वाट्या व काळे मणी असलेले सोन्याचे गंठण हिसकावून बळजबरीने चोरून नेले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे त्यांनी मोठ्याने आरडाओरडा केला, परंतु आजूबाजूचे नागरिक घटनास्थळी जमा होण्याअगोदरच मोटारसायकलस्वार रामकृष्ण कॉलनीच्या दिशेने निघून गेले. मोटारसायकलवर बसलेल्या एकाने काळा टी शर्ट व निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट घातलेली होती. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास पोलिस करीत आहेत.

COMMENTS