प्रतिनिधी : सातारा साताऱ्यातले आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसलेंच्या कार्यकर्त्यांतील वैर संपूर्ण राज्याला माहीत आहे.&nb
प्रतिनिधी : सातारा
साताऱ्यातले आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसलेंच्या कार्यकर्त्यांतील वैर संपूर्ण राज्याला माहीत आहे.
अधूनमधून त्यांच्यात किरकोळ बाचाबाची-चकमकी होत असतात. मात्र, त्यांच्यात शहरात पहिल्यांदाच सशस्त्र चकमक झाली. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
बुधवारी संध्याकाळी उदयनराजे समर्थक सनी भोसले यांनी शिवेंद्रराजे समर्थक बाळासाहेब खंदारे यांच्या दुर्गापेठेतील ऑफिससमोर गाडी लावली, त्या वादातून भडका उडाला;
दोन्ही गटांच्या तुफान हाणामारीत सहा जण गंभीर जखमी झालेत. सनी भोसले हा रात्री सव्वाआठच्या सुमाराला मित्रांसोबत दुर्गापेठेत गेला होता. तिथेच बाळासाहेब खंदारे यांचे कार्यालय आहे.
सनीने कार्यालयासमोरच गाडी लावल्याने खंदारे आणि भोसले यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची सुरू झाली. नंतर मारामारी झाली. गुप्ती, रॉड, कोयता याचा हल्ल्यासाठी वापर झाला.
पिस्तूलही दाखवले, असे तक्रारीत म्हटले आहे. नगरसेवक बाळू खंदारेसह त्याच्या साथीदारांविरुद्ध दरोडा, हाफ मर्डरसह विविध कलमान्वये सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मारामारीत पाच जण जखमी झाले आहेत.
रुग्णालयाच्या परिसरात समर्थक कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. संबंधित खासगी हॉस्पिटलबाहेर तणावाचे वातावरण आहे. बाळू खंदारे, आकाश नेटके, शुभम भिसे, शैलेश बडेकर, निखिल कीर्तिकर यांच्यासह इतर अनोळखी आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणी सनी मुरलीधर भोसले (सर्व रा. सातारा) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. संशयितांनी गुप्ती, रॉड, कोयता याचा हल्ल्यासाठी वापर केला. पिस्तूलचा धाक दाखवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. राजपथावरील पोलीस करमणूक केंद्राच्या गेट परिसरात हा संपूर्ण प्रकार घडला.
COMMENTS