सातारा जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 2 हजार 28 रुग्ण; उपचारादरम्यान 44 बाधितांचा मृत्यू

Homeमहाराष्ट्रसातारा

सातारा जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 2 हजार 28 रुग्ण; उपचारादरम्यान 44 बाधितांचा मृत्यू

सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2 हजार 28 रुग्णांचे अहवाल कोरोना बाधित  आले आहेत.

नवव्या मजल्यावरुन पडून मजुराचा दुर्दैवी अंत | LOK News 24
वाजेगाव निंबळकमध्ये अवैध गुटखा जप्त
जामखेडकरांचे पाण्यासाठी हाल सुरूच

सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2 हजार 28 रुग्णांचे अहवाल कोरोना बाधित  आले आहेत. तसेच विविध ठिकाणी उपचार घेत असलेल्या 44 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे :- जावली 131 (5658), कराड 206 (17491), खंडाळा  104 (7243), खटाव 185 (10220), कोरेगांव 215 (9958), माण 145 (7612), महाबळेश्‍वर 16 (3484), पाटण 93 (4920), फलटण 341 (15516), सातारा 447 (26840), वाई 132 (8863 ) व इतर 13 (640) असे आज अखेर एकूण 1 लाख 18 हजार 445 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे :- जावली 0 (108), कराड 10 (485), खंडाळा 2 (94), खटाव 3 (284), कोरेगांव 2 (255), माण 3 (155), महाबळेश्‍वर 2 (36), पाटण 2 (125), फलटण 6 (203), सातारा 9 (814), वाई 5 (225) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 2 हजार 784 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना मुक्त झालेल्या 2 हजार 55 रुग्णांना आज डिस्चार्ज

सातारा जिल्ह्यातील विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले आज संध्याकाळपर्यंत 2 हजार 55 रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

COMMENTS