Homeमहाराष्ट्रसातारा

सातारा जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 820 रुग्ण; 27 जणांचा मृत्यू

सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 820 रुग्णांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.

देवगिरी प्रतिष्ठान बीड आयोजित साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे  राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धत लातूरची प्रतीक्षा मोरे प्रथम 
तीन भावंडासह आईचा मृतदेह विहीरीत आढळला ; संगमनेर तालुक्यातील खांडगेदरा गावातील घटना
महाराष्ट्रात आढळले कोरोनाचे 13 नवे रूग्ण

सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 820 रुग्णांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच उपचारादरम्यान 27 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे : जावली 54 (8228), कराड 205 (25197), खंडाळा 37 (11373), खटाव 61 (18541), कोरेगांव 84 (15970), माण 56 (12554), महाबळेश्‍वर 8 (4205), पाटण 39 (7852), फलटण 43 (27707), सातारा 188 (38549), वाई 43 (12262) व इतर 2 (1212) असे आज अखेर एकूण 1 लाख 83 हजार 655 रुग्णांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे : जावली 0 (185), कराड 2 (739), खंडाळा 0 (146), खटाव 5 (462), कोरेगांव 1 (366), माण 2(249), महाबळेश्‍वर 0 (44), पाटण 4 (180), फलटण 2 (276), सातारा 11 (1178), वाई 0 (322) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यात एकूण 4 हजार 147 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

COMMENTS