साई मंदिरात महाआरती व महाप्रसाद संपन्न

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साई मंदिरात महाआरती व महाप्रसाद संपन्न

नगर- वसंतटेकडी येथील श्रीराम चौकातील संदेशनगर मधील द्वारकामाई साई मंदिरात प्रत्येक महिन्यात शेवटच्या गुरुवारी साईंची महाआरती,विविध सांस्कृतिक तसेच

सावेडी येथील सय्यद पीर बाबांच्या मजारवर जाण्यासाठी रस्ता खुला करुन द्यावा
विकासकामांना आडवे आला तर सोडणार नाही
वैष्णवदेवी बालमित्रांनी साकारली किल्ल्याची प्रतिकृती

नगर-

वसंतटेकडी येथील श्रीराम चौकातील संदेशनगर मधील द्वारकामाई साई मंदिरात प्रत्येक महिन्यात शेवटच्या गुरुवारी साईंची महाआरती,विविध सांस्कृतिक तसेच भक्तिमय कार्यक्रम,महाप्रसाद असे विविध प्रकारचे कार्यक्रम राबवले जातात.यावर्षीच्या ऑक्टोबर महिन्याच्या

शेवटच्या गुरुवारी साईं भजनसंध्या व महाप्रसाद संपन्न झाला  

            यावेळी महाआरती अन्नदाते बाबासाहेब केदारव मान्यवरांच्या यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी नगरसेवक सुनील त्र्यबंके, 

तोफखाना पोलीस स्टेशनचे पीआय श्री मुजावर व समाधान सोळंके,बबलू सूर्यवंशी,अध्यक्ष योगेश पिंपळे,दीपक कुडिया आदीसह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते 

            संध्याकाळी साईनाथ भजनसंध्या संपन्न झाली यामध्ये श्री नाथ महाराज यांचे कीर्तन झाले नंतर तोफखाना पोलीस स्टेशनचे पी आय श्री मुजावर व समाधान सोळंके यांनी चोरी न होण्यासाठी घावयाची काळजी, मंगळसूत्र कसे ओढले जाते याबद्दल माहिती देऊन त्यांनी हे टाळण्यासाठी काय केले पाहिजे हे सांगून त्यांनी काही अडचण आल्यास आपले पर्सनल मो न. उपस्थित भाविकांना देऊन काही संशियत वाटल्यास कॉल करावा असे आवाहन केले  

            यावेळी शैलेश पवणे,राहुल पाटोळे व योगेश पिपळे यांच्या डिजिटल बँकच्या ग्राहक सेवा केंद्राचे उदघाटन करण्यात आले तसेच राष्ट्रीय मानव अधिकार व भ्रस्टाचार निवारण भारत व तनीक्ष  महिला ग्रुपच्या राणी पंडित,मीना रणशूर,निर्मला कुडिया,प्रिया शिंदे,नेहा कुडिया,

शशिकला मुदिगंटी यांचा सत्कार सीमा त्र्यबके यांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर साईंची महाआरती होऊन नंतर बाबासाहेब केदार तसेच 

साईभक्त अन्नदाते यांच्याकडून महाप्रसाद झाला 

          कार्यक्रम यशश्वीतेसाठी साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान,संदेशनगरच्या पदाधिकारी व सदस्यांनी तसेच परिसरातील तरुण मंडळांनी परिश्रम घेतले 

COMMENTS