सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘अर्धनग्न मोर्चा’

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘अर्धनग्न मोर्चा’

सांगली - भाजपा खासदार संजयकाका पाटील यांच्या कारखान्याच्या थकीत ऊस बिलाच्या मागणीसाठी सांगलीमध्ये शेतकऱ्यांनी थेट अर्धनग्न मोर्चा काढत निषेध आंदोलन क

सैराटच्या प्रिन्सवर अटकेची टांगती तलवार
पालघरमध्ये बनावट जिर्‍याचा कारखाना उघडकीस
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघातात तिघांचा मृत्यू

सांगली – भाजपा खासदार संजयकाका पाटील यांच्या कारखान्याच्या थकीत ऊस बिलाच्या मागणीसाठी सांगलीमध्ये शेतकऱ्यांनी थेट अर्धनग्न मोर्चा काढत निषेध आंदोलन केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला.तासगाव आणि नागेवाडी येथील यशवंत सहकारी साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची देणी थकीत आहेत. भाजपाचे खासदार संजयकाका पाटील यांच्या मालकीचे हे दोन्ही कारखाने आहेत. गेल्या आठ महिन्यांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली ही थकीत बाकी देण्यासाठी वारंवार आंदोलन करण्यात येत आहेत. मात्र, संजयकाका पाटील यांच्याकडून केवळ आश्वासने देण्यात असून त्याची पूर्तता अद्याप झालेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्त्वात विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा काढला. हा मोर्च्यात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.

COMMENTS