सर्वसामान्य जनतेला मोदींकडून अपेक्षा आहे की ते पेट्रोल डिझेल कमी करणारा केक कापतील

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सर्वसामान्य जनतेला मोदींकडून अपेक्षा आहे की ते पेट्रोल डिझेल कमी करणारा केक कापतील

प्रतिनिधी : मुंबईपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७१ वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने सर्व स्तरावरून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून शिवसेनेचे

Indapur : मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास नुकसान भरपाई देणार : भरणे | LOKNews24
रवी राणांना भेटल्यानंतर नवनीत राणांना अश्रू अनावर
‘कुटासा इको टुरिझम’च्या प्रस्तावाला गती द्या ; राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश

प्रतिनिधी : मुंबई
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७१ वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने सर्व स्तरावरून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही त्यांना अनेख्या शुभेच्छा देत मोदींचे तोंडभरून कौतुक केले आहे.

अटल बिहारी वाजपेयींनंतर भाजपाला शिखरावर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले आहे. त्यांच्या तोडीचा आज दुसरा नेता देशात दिसत नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी मोदींच्या वाढदिवसानिमीत्ताने दिली . ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

राजकारणात पंतप्रधान मोदींचा विरोध असला तरी त्यांचे कार्य, भूमिका आणि नेतृत्वाबद्दल त्यांना शुभेच्छा देत आहोत. यापूर्वी भाजपने नेहमी आघाड्या करून सत्ता स्थापन केली. मात्र मोदींनी भाजपाला पूर्ण बहुमत मिळवून दिले .

मोदींचे नेतृत्व अद्भुत आहे. तसेच संध्याकाळी वाढदिवस संपल्यावर ते कोणता केक कापतील हे पाहावे लागेल. देशात एकीकडे महागाईचा भडका आहे. पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले.

त्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोदींकडून अपेक्षा आहे की ते पेट्रोल डिझेल कमी करणारा केक कापतील , असा टोलाही राऊत यांनी मोदींना लगावला आहे .

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानावरून पुन्हा संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. चंद्रकांत पाटील हे नागालँडचे राज्यपाल होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

तसे माझ्या कानावर आलं. त्यांना राज्यपालपदाची ऑफर आली होती. त्यामुळेच त्यांनी माजी मंत्री म्हणू नका असे म्हटले असावे . चंद्रकांत पाटील हे आमचे चांगले मित्र असले तरी माजी मंत्री म्हणण्याची वेदना मी समजू शकतो .

मात्र तुम्हाला 25 वर्षे माजी मंत्री म्हणूनच राहावे लागेल. उद्धवजींच्या नेतृत्वात सरकार कायम राहणार आहे. चंद्रकांतदादा अवतारी पुरुष असून ते ते काही तरी चमत्कार घडवतील, असा टोलाही राऊत यांनी लगावला .

COMMENTS