सर्वसामान्यांचा लालपरीचा प्रवास महागणार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सर्वसामान्यांचा लालपरीचा प्रवास महागणार

मुंबई :आधीच तोटयात असलेले एसटी महामंडळ कोरोनाच्या धक्क्याने मोठया आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे अनेक महिने एसटी बस सेवा बंद

अल्पवयीन मुलीची गळा आवळून हत्या
शिर्डी मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज
दुसर्‍या लाटेची पुन्हा एकदा उसळी

मुंबई :आधीच तोटयात असलेले एसटी महामंडळ कोरोनाच्या धक्क्याने मोठया आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे अनेक महिने एसटी बस सेवा बंद होत्या. त्यानंतर बस सेवा सुरू केल्या तर त्याही अर्धे प्रवासी घेऊन प्रवास करण्यावर निर्बंध लादले. त्यामुळे एसटी बस महामंडळाला मोठा फटका सहन करावा लागला. अखेर एसटी महामंडळाने बसच्या तिकीट दरात वाढ करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे हा प्रस्ताव मान्य झाल्यास सर्वसामान्यांचा बसचा प्रवास महागणार आहे.
कोरोना आणि इंधनदरवाढीमुेळे एसटी महामंडळाचे मोठे नुकसान झाले आहे. पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या किंमती, जादा तिकीट दर, खासगी वाहतूकदारांच्या तीव्र स्पर्धेने हतबल झालेल्या एसटी महामंडळाने भाडेवाढ करण्याचा कटू निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. येत्या काही दिवसांत एसटी महामंडळ भाडेवाढ करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महामंडळाने तयार केला आहे. एसटीचे दररोज 21 कोटी रुपयांचे उत्पन्न कोरोनाच्या काळात लाखांवर आले होते. जुलैमध्ये हे उत्पन्न 8 कोटीपर्यंत गेले होते. मात्र, पुरेसे उत्पन्न नसल्याने एसटी कर्मचार्‍यांना वेतन देण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यासाठी राज्य सरकारची मदत घ्यावी लागत आहे. एसटी महामंडळाच्या 15 ते 16 हजार बस डिझेलवर धावत आहेत. त्यातील सध्या 10 हजार गाड्या प्रवासी वाहतूकीसाठी धावत आहेत. त्यासाठी दररोज 8 लाख लिटर डिझेल लागत आहे. एसटीच्या महसुलाच्या 38 टक्के महसूल हा इंधनासाठी खर्च होत आहे. महामंडळाच्या निर्णयामुळे सर्वसामान्य प्रवाशांना जादा भाडे मोजून एसटीचा प्रवास करणे भाग पडणार आहे. या वाढीमुळे एसटीच्या महसुलात काही प्रमाणात वाढ होईल, यासाठी भाडेवाढ करण्यात येणार आहे.

COMMENTS