समृद्धी महामार्ग श्रीमंतांसाठीचाच… ५२० किमीचा ८३० रुपयांचा टोल…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समृद्धी महामार्ग श्रीमंतांसाठीचाच… ५२० किमीचा ८३० रुपयांचा टोल…

प्रतिनिधी : नागपूरसमृद्धी महामार्गावरुन प्रवास करण्यासाठी किती टोल द्यावा लागेल, हा प्रश्न उपस्थित केला जात होता. आता या महामार्गावरून शिर्डी ते नागप

भिंगार परीसरात घरफोडी; दागिन्यासह व रोकड लंपास
अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ
जमियत उलमा ए हिंदने घेतली पोलीस अधीक्षकांची विशेष भेट

प्रतिनिधी : नागपूर
समृद्धी महामार्गावरुन प्रवास करण्यासाठी किती टोल द्यावा लागेल, हा प्रश्न उपस्थित केला जात होता. आता या महामार्गावरून शिर्डी ते नागपूर प्रवास करण्यासाठी मोठा टोल द्यावा लागणार आहे.

त्यामुळे हा महामार्ग श्रीमंतांसाठीच असल्याचे स्पष्ट होत आहे. अखेर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरणाने टोलचे दर जाहीर केले आहेत.

समृद्धी महामार्गासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार १ रुपया ६५ पैसे प्रति किमी दराने टोल आकारणी करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

समृद्धी महामार्ग प्रकल्पातील नागपूर ते शिर्डी हा ५२० किमी लांबीचा मार्ग डिसेंबर २०२१ पासून वाहतुकीसाठी उपलब्ध होणार आहे. तर पुढील वर्षी २०२२ मध्ये ७०० किमीचा संपूर्ण मार्ग वाहतुकीस खुला होणार आहे.

मात्र या मार्गाचा वापर करण्यासाठी वाहनचालक आणि प्रवाशांना टोलपोटी १ रुपया ६५ पैसे प्रति किमी दराने शुल्क भरावे लागणार आहे.

त्यामुळे मुंबई ते नागपूर एकेरी प्रवास करायचा असेल तर १,१५७ रुपये मोजावे लागणार आहेत. तर नागपूर ते शिर्डी प्रवासासाठी अंदाजे ८३० रूपये मोजावे लागणार आहेत.

COMMENTS