सचिन वाझेवर बडतर्फीची कारवाई करणार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सचिन वाझेवर बडतर्फीची कारवाई करणार

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरापासून 300 मीटर अंतरावर ठेवलेली स्फोटके भरलेली गाडी, या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेनची हत्यायाबाबतचा पुरेसा तपास एनआयने केला आहे.

माजलगाव नगर परिषदेची कारवाई सुरू
यु ट्यूब चॅनलला कमी व्ह्यूज मिळाल्याने तरुणाची आत्महत्या.
शिक्षणरत्न पुरस्काराने दीपक भुजबळ सन्मानीत

मुंबई / प्रतिनिधीः उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरापासून 300 मीटर अंतरावर ठेवलेली स्फोटके भरलेली गाडी, या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेनची हत्यायाबाबतचा पुरेसा तपास एनआयने केला आहे. त्याबाबतचे पुरावे हाती आल्याने आता त्याला बडतर्फ करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

मुंब्रा खाडीतून हिरेनचा मृतदेह आढळला. त्यानंतर नऊ हजार कॉल डिटल्स तपासण्यात आले. माजी कॉन्टेबल विनायक शिंदे आणि क्रिकेट बुकी नरेश गोरेपर्यंत एटीएस पोहोचली होती. गोरे याने त्यांच्या बार डान्सर मैत्रिणीला यापैकी एक सिम दिले होते. यावरुनच एटीएसने संबंध जोडला आणि गोरेला गुजरातच्या एका हॉटेलमधून आणि नंतर विनायक शिंदेला ताब्यात घेतले. अँटिलिया प्रकरणात अटक करण्यात आलेल्या वाझे याला पोलिस खात्यातून काढून टाकण्याची तयारी सुरू झाली आहे. गृहखात्याच्या सूचनेनंतर मुंबई पोलिस वाझेला एक ते दोन दिवसांत काढून टाकू शकतात. राज्य घटनेच्या कलम 311 (2) अंतर्गत वाझेवर खटला चालवला जाईल. दरम्यान, अंबानी धमकी तसेच हिरेन हत्या प्रकरणाच्या तपास पथकाचे प्रमुख पोलिस महानिरीक्षक अनिल शुक्ला यांचा राष्ट्रीय तपास यंत्रणेतील कार्यकाळ सोमवारी संपुष्टात आला. ते केंद्रशासित प्रदेशातील आयपीएस अधिकारी असून त्यांची पाच वर्षांसाठी ‘एनआयए’मध्ये प्रतिनियुक्ती करण्यात आली होती. शुक्ला यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर रिक्त  होणारे महानिरीक्षकपद भरण्यासाठी उपमहानिरीक्षक ज्ञानेंद्रकुमार वर्मा यांना बढती देण्यात आली. त्यामुळे अंबानी धमकी तसेच मनसुख हत्येच्या तपासाची जबाबदारी वर्मा यांच्याकडे दिली जाईल, असे ‘एनआयए’तील वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. ‘एनआयए’मध्ये संपूर्ण देशासाठी चार महानिरीक्षक दर्जाचे अधिकारी आहेत.

COMMENTS