संजय राऊत यांच्या अहंकाराचा बेळगावात पराभव : फडणवीसांचा टोला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजय राऊत यांच्या अहंकाराचा बेळगावात पराभव : फडणवीसांचा टोला

प्रतिनिधी : नागपूरबेळगावात भाजपकडून निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी निम्म्यापेक्षा जास्त नगरसेवक हे मराठी आहेत. याची माहिती बहुधा राऊतांना नसावी. बेळगाव

राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का !
इस्त्रोचा नवा विक्रम
गर्दीने भरलेल्या बसमधून शालेय विद्यार्थी पडला रस्त्यावर

प्रतिनिधी : नागपूर
बेळगावात भाजपकडून निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी निम्म्यापेक्षा जास्त नगरसेवक हे मराठी आहेत. याची माहिती बहुधा राऊतांना नसावी. बेळगाव महालिकेत भगवाच फडकला आहे.

बेळगावात मराठी माणसाचा पराभव झाला नाही तर राऊतांच्या अहंकाराचा झाला आहे. मराठी माणसाचा पराभव आणि पक्षाचा पराभव एक होऊच शकत नाही, असा दावा फडणवीस यांनी केला.

बेळगाव महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने इतिहास घडवत गेल्या ३५ वर्षांपासून महाराष्ट्र एकीकरण समितीची मक्त्तेदारी मोडीत काढली. या महापालिकेत पहिल्यांदाच एखाद्या राष्ट्रीय पक्षाचा महापौर विराजमान होणार आहे.

मात्र निवडणुकीच्या या निकालावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केला. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी बेळगावात मराठी माणसाचा पराभव घडवून आणला, असा आरोप राऊत यांनी केला होता.

त्याला आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांना लक्ष्य केले. बेळगावात मराठी माणसाचा पराभव होऊच शकत नाही. मात्र संजय राऊतांच्या अहंकाराचा नक्कीच पराभव झाला, असा खरमरीत टोला फडणवीसांनी हाणला. ते आज नागपुरात माध्यमांशी बोलत होते.

यावेळी त्यांनी गोवा विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सोपवल्याबद्दल पक्षाध्यक्ष, पंतप्रधान, गृहमंत्र्यांचे आभार मानले. तसेच गोव्यात भाजपचेच सरकार पुन्हा सत्तेत येण्याचा दावा केला. आतापर्यंत चार राज्यांच्या निवडणुकीचा प्रभार माझ्यावर सोपवण्यात आला होता. आता गोव्याचीही जबाबदारी देण्यात आली आहे. माझा आणि गोव्याचा यापूर्वीही संपर्क आलेला आहे. गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आमच्यामध्ये नसले तरी त्यांच्या विचाराने आणि प्रेरणेने गोव्याची निवडणूक नक्कीच जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सचिन वाझे प्रकरणी एनआयएने दाखल केलेल्या चार्जशीट प्रकरणी बोलताना फडणवीस म्हणाले, झालेला घटनाक्रम बघितला तर हा नक्कीच राज्य सरकारला धक्का देणारा आहे. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात पोलीसमधील लोक अशा प्रकारची घटना करू शकतात यापेक्षा धक्कादायक काय असू शकतं? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

COMMENTS