संगमनेर तालुक्यात महिलेचा खुन; आरोपीस अटक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेर तालुक्यात महिलेचा खुन; आरोपीस अटक

संगमनेर तालुक्यातील कर्हे शिवारात किरकोळ भांडणाच्या कारणावरून जबर मारहाण करून महिलेचा खून करण्यात आला आहे.

संगमनेर तालुक्यात वेश्या व्यवसायावर छापा
सद्गुणी, सेवाभावी माणसांच्या सहवासामुळे जीवनाचे सोने होते
संगमनेरच्या घुलेवाडी येथील यात्रेला लाखोंची गर्दी

संगमनेर/प्रतिनिधी : संगमनेर तालुक्यातील कर्हे शिवारात किरकोळ भांडणाच्या कारणावरून जबर मारहाण करून महिलेचा खून करण्यात आला आहे. मंगल भाऊसाहेब पथवे ( वय ४५ रा. उंचखडक ता. अकोले) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. सोमवार दि.२२ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास ही खळबळजनक घटना उघडकीस आली. या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस श्वान पथकाने शोधून काढले. याप्रकरणी आरोपी राजु शंकर कातोरे याच्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. 

याबाबतची माहिती अशी कि, आरोपी राजु शंकर कातोरे (वय ५० वर्षे रा. गर्दनी ता. अकोले) व मय त मंगल भाऊसाहेब पथवे (वय ४५ रा. उंचखडक ता. अकोले) हे दोघेही रामदास म्हतारबा सानप (रा. कर्हे ता. संगमनेर) यांच्या वस्तीवर वाटयाने शेती करीत होते. त्यांना दारू पिण्याची सवय होती. दि. २१ मार्च रोजी आरोपी राजु कातोरे व मयत मंगल भाऊसाहेब पथवे हे सोबत होते. दि. २२ मार्च रोजी मंगल पथवे ही दिसली नाही. त्यानंतर आरोपीने नियंत्रण कक्ष येथे फोन करून मंगल पथवे हिचा खून झाल्याचे कळविले. त्यानंतर संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी जावून पंचनामा केला. यावेळी श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. या परिसरात आढळून आलेल्या चप्पल जोडचा श्वानाने वास घेतला व श्वान आरोपी राजू कातोरे याच्या शेडजवळ जाऊन भुंकले. मिळालेल्या चप्पल जोडचा श्वानास वास देवून ओळख घेतली असता श्वानाने राजू शंकर कातोरे याच्या अंगावर भुंकून ओळख पटविली. पोलिसांनी संशयीत आरोपी राजू कातोरे याची चौकशी केली असता त्यानेच मंगल पथवे हिच्याशी झालेल्या किरकोळ भांडणावरून तिला जबर मारहाण करून जिवे ठार मारले असल्याचे समोर आले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी भेट दिली. पो. ना. अनिल जाधव यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी राजु शंकर कातोरे याच्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार हे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहे.

COMMENTS