श्रीरामपूरात पहिल्यांदा कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन दोन्ही लसींचे एकत्रित शिबीर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीरामपूरात पहिल्यांदा कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन दोन्ही लसींचे एकत्रित शिबीर

श्रीरामपूर(प्रतिनिधी)-  संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेणाऱ्या कोरोनाला हरवण्यासाठी सर्वांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. लसीकरण अभियान राबविण्यासाठी स

स्पर्धा परीक्षांसाठी युवकांनी सक्षम व्हावे -विकास सावंत
शिव प्रहार संघटनेच्या चिथावणीखोर वक्तव्याचा ख्रिश्चन समाजाच्या वतीने निषेध नोंदवून कारवाई करण्याची मागणी
म.गांधी व लालबहाद्दूर शास्ञी यांचे जीवन कार्य प्रेरणादायी; माजी आ.मुरकुटे

श्रीरामपूर(प्रतिनिधी)- 

संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेणाऱ्या कोरोनाला हरवण्यासाठी सर्वांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. लसीकरण अभियान राबविण्यासाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घेणे कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन जिल्हा नियोजन समिती सदस्या, नगरसेविका सौ.स्नेहल केतन खोरे यांनी मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांच्या विशेष सहकार्याने आयोजित केलेल्या प्रभाग १६ मधील लसीकरण शिबीर शुभारंभप्रसंगी केले. 

यावेळी अशोक बँकेचे संचालक नाना पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश राठी, भाजपचे शहरप्रमुख मारुती बिंगले, युवासेना शहरप्रमुख निखिल पवार, विजय पाटील, नितीन क्षीरसागर, महाराष्ट्र सेवा मंडळाचे वसंतलाल पटेल, संतोष कासलीवाल, दिनेश तरटे सर, मुख्यध्यापिका रेखा कुलकर्णी, मुख्यध्यापिका संजीवनी खलाटे, कल्पना सूर्यवंशी, नीता भोसले आदी उपस्थित होते.

श्रीरामपूर नगरपरिषद, महाराष्ट्र सेवा मंडळ, मोरया फाउंडेशन यांच्या विशेष सहकार्याने आयोजित केलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबीर प्रसंगी बोलताना स्नेहल खोरे म्हणाल्या की, श्रीरामपूरात पहिल्यांदाच कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन दोन्ही लसींचे एकत्रित शिबीर आपल्या प्रभागात घेण्यात आल्याचे सांगितले. विविध सामाजिक संघटनांनी, नगरसेवकांनी पुढाकार घेतल्याने श्रीरामपूर शहरातील प्रत्येक प्रभागात लसीकरण मोहिमेने वेग घेतला आहे. 

नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने लसीकरण मोहिमेत सहभाग घेतल्यास कोरोनाला हरविणे सहजशक्य असल्याचे खोरे म्हणाल्या. मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांनी लसीकरण मोहिमेत अग्रभागी असलेले श्रीरामपूर नगरपरिषदेचे डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, आशा सेविकांसह लसीकरण मोहिमेसाठी पटेल हायस्कुलची जागा उपलब्ध करून देणारे महाराष्ट्र सेवा मंडळाचे अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष संजय फंड, मोरया फाउंडेशनच्या सदस्यांचे आभार मानले.

कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींचे पहिले व दुसरे दोन्ही डोस १८ वर्षापुढील ३५० हून अधिक नागरिकांना देण्यात आले. यावेळी किशोर झिंजाड, विवेक तांबे, राहुल पटारे, राहुल रुपनर, वसीम शेख, इरफान पठाण, अविनाश गायकवाड, दिनेश यादव, तोहीत पिंजारी, परदेशी सिस्टर, पाटोरे सिस्टर, आयशा पठाण, विशाल पठारे, संगीता वानखेडे, नीता सातदिवे, आशा तायडे, लोळगे सिस्टर आदींनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS