भातकुडगाव फाटा : लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्यात गळीतास येत असलेल्या ऊसाला प्रतिटन ३ हजार रुपये दर जिल्ह्यात सर्व प्रथम जाहीर करून त्याप्रमाणे ऊसाचे पेमेंट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वेळच्यावेळी वर्ग करण्यात करण्यात येत आहे. ज्ञानेश्वर कारखान्याचा ऊस वजनकाटा पारदर्शक असून सर्व शेतकऱ्यांनी आपल्या सहकारी साखर कारखान्यास परिसरातील संपूर्ण ऊस गळीतास देऊन सहकार्य करावे असे आवाहन लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी केले. नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना सांस्कृतिक मंडळाचे वतीने मकर संक्रांतिनिमित्त आयोजित सामुदायिक तिळगुळ वाटप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून घुले बोलत होते. कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग,काशीनाथ नवले, काकासाहेब शिंदे, पंडितराव भोसले,अशोकराव मिसाळ, प्रा.नारायणराव म्हस्के,भाऊसाहेब कांगुणे, शिवाजीराव कोलते,सखाराम लव्हाळे,विकास नन्नवरे, दादासाहेब गंडाळ, माजी संचालक निवृत्ती दातीर, दिलीपराव मोटे, कार्यकरी संचालक अनिल शेवाळे, जनरल मॅनेजर रविंद्र मोटे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी बोलताना घुले पाटील पुढे म्हणाले की, लोकनेते मारुतराव घुले पाटील यांनी सामुदायिक तिळगुळ वाटपाची परंपरा सुरू केली,ती सुरूच आहे. आपला कारखाना तांत्रिक दृष्ट्या परिपूर्ण असून दररोज १० हजार मेट्रिक टनाहून अधिक ऊस गाळप करण्याची क्षमता असल्याने सर्व ऊसाचे वेळेत गाळप पूर्ण होईल, त्यामुळे ऊस बाहेर देण्याची घाई करू नये. ज्ञानेश्वर कारखाना हा कोणा एकट्याचा नसून ती सर्व शेतकऱ्यांची कामधेनू आहे, या कामधेनूला जपण्यासाठी बाहेर ऊस देऊ नका असे आवाहन केले. काशिनाथ नवले, काकासाहेब शिंदे, बबनराव धस यांनी ही मनोगत व्यक्त केले.जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्तात्रय काळे,दिलीप सरोदे, बबनराव धस, डॉ. शिवाजी शिंदे, नामदेव निकम,अंबादास गोंडे,अड.रविंद्र गव्हाणे, विजयकुमार नवले, वैभव नवले आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक अनिल शेवाळे यांनी केले तर दादासाहेब गंडाळ यांनी आभार मानले.सूत्रसंचालन सुखदेव फुलारी यांनी केले.

भातकुडगाव फाटा : लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्यात गळीतास येत असलेल्या ऊसाला प्रतिटन ३ हजार रुपये दर जिल्ह्यात सर्व प्रथम जाहीर करून त्याप्रमाणे ऊसाचे पेमेंट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वेळच्यावेळी वर्ग करण्यात करण्यात येत आहे. ज्ञानेश्वर कारखान्याचा ऊस वजनकाटा पारदर्शक असून सर्व शेतकऱ्यांनी आपल्या सहकारी साखर कारखान्यास परिसरातील संपूर्ण ऊस गळीतास देऊन सहकार्य करावे असे आवाहन लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी केले.
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना सांस्कृतिक मंडळाचे वतीने मकर संक्रांतिनिमित्त आयोजित सामुदायिक तिळगुळ वाटप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून घुले बोलत होते. कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग,काशीनाथ नवले, काकासाहेब शिंदे, पंडितराव भोसले,अशोकराव मिसाळ, प्रा.नारायणराव म्हस्के,भाऊसाहेब कांगुणे, शिवाजीराव कोलते,सखाराम लव्हाळे,विकास नन्नवरे, दादासाहेब गंडाळ, माजी संचालक निवृत्ती दातीर, दिलीपराव मोटे, कार्यकरी संचालक अनिल शेवाळे, जनरल मॅनेजर रविंद्र मोटे व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना घुले पाटील पुढे म्हणाले की, लोकनेते मारुतराव घुले पाटील यांनी सामुदायिक तिळगुळ वाटपाची परंपरा सुरू केली,ती सुरूच आहे. आपला कारखाना तांत्रिक दृष्ट्या परिपूर्ण असून दररोज १० हजार मेट्रिक टनाहून अधिक ऊस गाळप करण्याची क्षमता असल्याने सर्व ऊसाचे वेळेत गाळप पूर्ण होईल, त्यामुळे ऊस बाहेर देण्याची घाई करू नये. ज्ञानेश्वर कारखाना हा कोणा एकट्याचा नसून ती सर्व शेतकऱ्यांची कामधेनू आहे, या कामधेनूला जपण्यासाठी बाहेर ऊस देऊ नका असे आवाहन केले. काशिनाथ नवले, काकासाहेब शिंदे, बबनराव धस यांनी ही मनोगत व्यक्त केले.जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्तात्रय काळे,दिलीप सरोदे, बबनराव धस, डॉ. शिवाजी शिंदे, नामदेव निकम,अंबादास गोंडे,अड.रविंद्र गव्हाणे, विजयकुमार नवले, वैभव नवले आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक अनिल शेवाळे यांनी केले तर दादासाहेब गंडाळ यांनी आभार मानले.सूत्रसंचालन सुखदेव फुलारी यांनी केले.

COMMENTS