शिवसेनेनं बेईमानी करत मुख्यमंत्रिपदाची भूमिका सांगितली आणि भाजपशी युती तोडली

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवसेनेनं बेईमानी करत मुख्यमंत्रिपदाची भूमिका सांगितली आणि भाजपशी युती तोडली

प्रतिनिधी : मुंबई२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेने दिलेला शब्द पाळला नाही त्यांनी बेईमानी केली, असेही मुनगंटीवार म्हणाले. ज्या प्र

हिमाचल प्रदेशात भाजपला बंडखोरीचे ग्रहण
महाविकास आघाडीने पुकारलेल्या उद्याच्या बंद मध्ये शेतकरी व व्यापारी यांनी सामील होऊ नये
ओवेसी यांच्याकडे भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाचं अंगवस्त्र म्हणूनच पहिले जाईल…

प्रतिनिधी : मुंबई
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेने दिलेला शब्द पाळला नाही त्यांनी बेईमानी केली, असेही मुनगंटीवार म्हणाले. ज्या प्रमाणे भाजपाचे कर्णधार नरेंद्र मोदी आहेत .

त्याच प्रमाणे प्रत्येक पक्षात नेतृत्व करणारे नेते प्रचंड क्षमतावान असतात. .नरेंद्र मोदींमध्ये इतकी प्रचंड क्षमता आहे की १९८४ मध्ये २ खासदार असलेल्या पक्षाला आज ३०३ खासदारांपर्यंत पोहोचवले.

पुढील २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत हा आकडा आणखी वाढणार असल्याचा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. आमच्यासाठी मोदी देशगौरव तर जगासाठी विश्वगौरव आहेत , असे सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

शिवसेना, काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) सोबत येत सत्ता स्थापन केली. यानंतर भाजपाकडून सतत शिवसेनेवर निशाणा साधण्यात येत आहे .

भाजपाचे (BJP) नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी शिवसेनेवर (Shivsena) टीकास्त्र सोडले. शिवसेनेचा खरा चेहरा स्व. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा आहे.

जर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो कमी केला तर शिवसेनेची किंमत शून्यापेक्षाही कमी होते, असे ट्विट करत मुनगंटीवार यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे .

शिवसेनेने युतीसाठी कधी प्रयत्न केले नाही . त्यामुळे भाजपाने युती तोडली ,असे म्हणणे चुकीचे आहे . विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपाचे १०५ आमदार आले तेव्हा असं वाटलं की आता भाजपा कुणाच्याही मदतीशिवाय सरकार स्थापन करणे कठीण आहे .

तेव्हाच शिवसेनेनं बेईमानी करत मुख्यमंत्रिपदाची भूमिका सांगितली आणि भाजपशी युती तोडली . आगामी २०२४ मध्ये पार पडणाऱ्या निवडणुकांमध्ये नक्कीच जनता महाविकास आघाडीला धडा शिकवेल ,असेही मुनगंटीवार म्हणाले .

COMMENTS