शिर्डी येथील क्रांती युवक मंडळाचे अभिनव पद्धतीने गणेश विसर्जन..

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिर्डी येथील क्रांती युवक मंडळाचे अभिनव पद्धतीने गणेश विसर्जन..

शिर्डी, : प्रतिनिधी मातृशक्तीच्या हस्ते महाआरती… पर्यावरण पूरक तुरटी पासून निर्मित गणेशाचे जलाभिषेक करून विसर्जन... तसेच माघील वर्षी ज्यांनी p

श्रद्धा व विकासाची सांगड घालून शिर्डीचे महत्व वृद्धिंगत करणार
शिर्डी विमानतळाभोवती शहर वसवण्याबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय..!
भाविक भक्तांच्या स्वागतासाठी साईबाबा संस्थान सज्ज!

शिर्डी, : प्रतिनिधी

मातृशक्तीच्या हस्ते महाआरती… पर्यावरण पूरक तुरटी पासून निर्मित गणेशाचे जलाभिषेक करून विसर्जन… तसेच माघील वर्षी ज्यांनी pop पासून गणपती स्थापित केले अशा सर्व गणेश मूर्तीचे प्रक्रिया करून खडूची निर्मिती केली त्याच खडूने लिखाणाचा श्रीगणेशा देखील करण्यात आला. क्रांती युवक मंडळ नेहमीच अभिनव उपक्रम राबवीत असते दरवर्षी ढोल पथकासह पारंपरिक गणेश विसर्जन मिरवणूक लक्ष वेधून घेते… 

कोरोना काळात सर्व नियमांचे पालन करून मंडळाने या वर्षी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या वर्षीचा विसर्जन सोहळा पार पडला.  मंडळाच्या यावर्षी सर्व कार्यकर्त्याच्या मातोश्री हस्ते महाआरती करण्यात आल्याने सर्वत्र कौतुक होत आहे… या प्रसंगी मातृशक्तीचे दर्शन झाले.. तसेच  माघील वर्षी नगरपंचायत व ग्रीन व क्लीन शिर्डी संस्थेच्या वतीने  pop पासून गणपतीवर प्रक्रीया करून खडूची निर्मिती करण्यात आली व त्याच खडू पासून आज जमलेल्या मातृशक्तीच्या हस्ते साक्षरतेचा संदेश धार्मिक संदेश लिहीत लिखाणाचा श्रीगणेशा करण्यात आला..  

सर्व मान्यवरांनी क्रांती युवक मंडळाच्या या उपक्रमाचे खूप कौतुक केले शिर्डीतील हे मंडळ निरव्यसनी मंडळ म्हणून ओळखले जाते तसेच साईसेवेत मोठा सहभाग असतो… या प्रसंगी बोलताना नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी सचिन तांबे सह सदस्यांचे  मंडळाच्या उपक्रमाचे  कौतुक करून पर्यावरन पूरक गणेशोत्सव हा उपक्रम शिर्डीतून संपूर्ण देशात संदेश जातो त्यामुळे सदर उपक्रम आदर्शवत असल्याचे सांगून पुढील वर्षी पासून प्लास्टर ऑफ पॅरिस  च्या गणेश मूर्ती विकण्यास बंदी घालण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

मुख्याधिकारी डोईफोडे साहेबांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपती पासून खडू निर्मिती हा उपक्रम ग्रीन अँड क्लीन शिर्डी या संस्थेला सोबत घेऊन राबविला व त्याला मोठा प्रतिसाद लाभला व संपूर्ण महाराष्ट्रात सदर उपक्रमाचे अभिनंदन झाले व क्रांती युवक मंडळाच्या या सर्व अभिनव उपक्रम अभिनंदनीय  झाले

COMMENTS