खंडाळा तालुक्यातील लोणंद पोलिस स्टेशनच्या हद्दीत वाठार बुद्रुक येथे 8 जून रोजी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता.
सातारा / प्रतिनिधी : खंडाळा तालुक्यातील लोणंद पोलिस स्टेशनच्या हद्दीत वाठार बुद्रुक येथे 8 जून रोजी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. अवघ्या 24 तासात या खुनाचा उलघगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. येरवडा जेलमध्ये आरोपी आणि मयत यांच्यात भांडणे झालेली होती. त्या वादातून खून झाल्याचे निष्पन्न झाले असल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
धीरज पाटील म्हणाले, लोणंद पोलिस स्टेशनच्या हद्दीतील वाठार बुद्रुक येथे 8 तारखेला निरा नदीच्या कालव्यात एक अज्ञात व्यक्तिचा मृतदेह आढळून आला होता. लोणंद पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद करून शवविच्छेदन करण्यात आले, तेव्हा त्या व्यक्तीचा गळा दाबून खून करण्यात आला असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मृतदेहाची ओळख पटविल्यानंतर अवघ्या 24 तासांत गुन्ह्याचा तपास करून छडा लावण्यात आला आहे. एका आरोपीला अटक करण्यात आले असून एकजण फरार आहे. आरोपीनी गुन्हा कबूल केला असून दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. एकजण हद्दपार तर दुसर्या आरोपीवर 6 गुन्हे दाखल आहेत. तर खून झालेला इसमही गुन्हेगार होता. जेलमध्ये या तिघांमध्ये वाद झाल्यानेच त्यांचा खून करण्यात आला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुन्ह्यातील संशयीत आरोपी वैभव सुभाष जगताप (वय 28 वर्षे, रा. पांगारे ता. पुरंदर जि. पुणे) हा पोलिसांची चाहूल लागताच मोटारसायकलवर बसून आडरानात पळून जात असतानाच त्याला फिल्मी स्टाईलने पाठलाग करून पकडले. त्याच्याकडे विचारपुस केली असता उडवाउडविची उत्तरे देवून पोलीसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू लागला. परंतु इंट्रोगेशन स्किलचा वापर करुन उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी आरोपींनी सदरचा खुन कसा व कोठे केला हे निष्पन्न केले.
सदर गुन्हाचे तपासामध्ये आरोपी वैभव जगताप, त्याचा साथीदार ऋषिकेश पायगुडे व मयत हे येरवडा जेल येथे शिक्षा भोगत असताना झालेल्या वादावरून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर गुन्हातील आरोपींनी यापूर्वी खुनाचे गुन्ह्यात येरवडा जेल मध्ये शिक्षा भोगली आहे. सदर क्लिष्ट स्वरुपाचा खुनाचा गंभीर गुन्हा हा कोणताही स्वरुपाचा आरोपी पर्यंत पोहचण्याचा धागादोरा नसताना लोणंद पोलीसांनी उघडकिस आणला आहे. सदर संशयीतास खुनाच्या गुन्हयात अटक करण्यात आली असून या गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विशाल के वायकर हे करीत आहेत.
या प्रकरणात अजयकुमार बंसल पोलीस अधिक्षक सातारा, धिरज पाटील अप्पर अधिक्षक, सातारा यांचे सुचनेप्रमाणे तसेच तानाजी बरडे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल के वायकर, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, सहा फौजदार शौकत सिकिलकर, देवेंद्र पाडवी, पो. अंमलदार महेश सपकाळ, अंकुश इवरे, अविनाश नलवडे, संतोष नाळे, ज्ञानेश्वर मुळीक, श्रीनाथ कदम, अभिजीत घनवट, सागर धेंडे, अविनाश शिंदे, विठ्ठल काळे, फैयाज शेख, अमोल पवार, शशिकांत गार्डी, गोविंद आंधळे, केतन लाळगे, महीला पोलीस अंमलदार प्रिया दुरगुडे चालक मल्हारी भिसे, शिंदे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
COMMENTS