शहर सहकारी बँकेचे बोगस कर्ज प्रकरण आता चर्चेत ; पुरवठादार मालपाणीला झाली अटक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शहर सहकारी बँकेचे बोगस कर्ज प्रकरण आता चर्चेत ; पुरवठादार मालपाणीला झाली अटक

नगरमधील सहकारी बँक बोगस कर्ज प्रकरणामुळे चर्चेत आली आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने याप्रकरणी एकाला अटक केली आहे.

मोहम्मद पैगंबरांविषयी आक्षेपार्ह वक्तव्याविरोधी कारवाई करा
पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथे रविवारी रात्री आठच्या सुमारास बिबट्या जेरबंद
कर्मवीर शंकरराव काळे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

 अहमदनगर/प्रतिनिधी- नगरमधील सहकारी बँक बोगस कर्ज प्रकरणामुळे चर्चेत आली आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने याप्रकरणी एकाला अटक केली आहे. त्यामुळे नगर शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या बोगस कर्जप्रकरणात पुरवठादार योगेश मालपाणी याला पोलिसांनी बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता चौकशीसाठी ताब्यात घेतले. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपअधीक्षक प्रांजल सोनवणे यांनी या माहितीला दुजोरा दिला. मालपाणी याच्याकडे संपूर्ण चौकशी केल्यानंतर त्याला दुपारी बारा वाजताच्या दरम्यान अटक करण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेने त्याला न्यायालयात हजर करण्याची तयारी केली आहे. 

शहर सहकारी बँकेच्या बोगस कर्जप्रकरणी गुन्ह्याचा तपास अद्याप सुरूच आहे. डॉ. नीलेश शेळके संचालित ’एम्स’ हॉस्पिटलमधील मशिनरी खरेदीसाठी अहमदनगर शहर सहकारी बँकेने 17 कोटी 25 लाख रुपयांचे बोगस कर्ज वाटप केल्याने डॉ. शेळके व बँकेचे संचालक मंडळ यांच्यासह 25 जणांविरुद्ध फसवणुकीचे तीन गुन्हे कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल आहेत. या मशिनरींचा पुरवठा योगेश मालपाणी याच्यामार्फत झाला होता, हे तपासात पुढे आले आहे. डॉ. शेळके याच्याविरोधात दाखल तीन गुन्ह्यांमध्ये स्वतंत्र दोषारोपपत्र 1 जून रोजी न्यायालयात दाखल झाले आहे. राहुरी येथील डॉ. रोहिणी भास्कर सिनारे, श्रीरामपूर येथील डॉ. उज्ज्वला रवींद्र कवडे, नगरमधील डॉ. विनोद अण्णासाहेब श्रीखंडे या तिघांनी फिर्याद दिली आहे. बनावट कागदपत्रांद्वारे या तिघांची प्रत्येकी 5 कोटी 75 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. योगेश मालपाणी हा डॉ. शेळकेच्या एम्स हॉस्पिटलच्या मशिनरीचा पुरवठादार होता. हॉस्पिटलमध्ये भागीदार असल्याने या तीनही डॉक्टरांची बनावट कागदपत्रे, बनावट सह्या करून शहर सहकारी बँकेकडून प्रत्येक डॉक्टरच्या नावावर परस्पर बोगस कर्ज मंजूर करून घेण्यात आले. बँकेचे संचालक मंडळ, तसेच नीलेश शेळके, मशिनरी डिलर्स योगेश मालपाणी, स्पंदन मेडिकेअर व आर. टी. कराचीवाला यांनी संगमत करून ही फसवणूक केल्याचा फिर्यादीत उल्लेख आहे. योगेश मालपाणीच्या अटकेमुळे या बोगस कर्जप्रकरणात मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे.

चर्चेतील तिसरी बँकनगरमधील नगर अर्बन बँक बोगस कर्जप्रकरणामुळे अडचणीत आली आहे. या बँकेसंदर्भात पिंपरी चिंचवड व कोतवाली पोलिस ठाण्यात दोन गुन्हेही दाखल झाले आहेत. त्यामुळे ही बँक सतत चर्चेत असते. त्यानंतर अहमदनगर मर्चंटस बँकही अशाच बोगस कर्जप्रकरणामुळे चर्चेत आली आहे. या बँकेच्या एका कर्जप्रकरणाबाबत रिझर्व्ह बँकेने आक्षेप नोंदवून बँकेला 1 कोटीचा दंड का करू नये, अशी नोटिसही बजावली आहे. या पार्श्‍वभूमीवर आता शहर सहकारी बँकही बोगस कर्ज प्रकरणामुळे चर्चेत आली आहे.

COMMENTS