शहर पोलिसांच्या वतीने टू प्लस मेळावा

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

शहर पोलिसांच्या वतीने टू प्लस मेळावा

पोलीस अधिक्षक .मनोज पाटील साहेब,अपर पोलीस अधिक्षक डॉ.दिपाली काळे मॅडम,मा.उप विभागीय पोलीस अधिकारी संजय सातव साहेब यांचे मागदर्शन व सुचने प्रमाणे आज

शिरसगावमध्ये महात्मा बसवेश्‍वर व कर्मवीरांना अभिवादन
संगमनेरची शांतता बिघडवणार्‍यांना यशस्वी होऊ देऊ नका
देवळाली प्रवरामध्ये चक्क पाळीव कुत्र्याचा केला दशक्रियाविधी

कोपरगाव शहर प्रतिनिधी- पोलीस अधिक्षक .मनोज पाटील साहेब,अपर पोलीस अधिक्षक डॉ.दिपाली काळे मॅडम,मा.उप विभागीय पोलीस अधिकारी संजय सातव साहेब यांचे मागदर्शन व सुचने प्रमाणे आज दि २६ मार्च २०२१  रोजी कोपरगांव शहर पो.स्टे. येथे ११ ते १.३० वा.दरम्यान टु प्लस ( दोन पेक्षा जास्त गुन्हे असलेले) यादीतील २३ आरोपी,दुय्यम पोलीस अधिकारी,पोलीस पाटील,बिट अंमलदार यांचा मेळावा घेण्यात आला मेळाव्या दरम्यान टु प्लस यादीतील गुन्हेगारांचे सर्व ऍ़गलने फोटो घेण्यात आले आहेत तसेच सदर गुन्हेगारांना त्यांचेवर दाखल असणारे गुन्हयाची त्यांना जाणीव करुन दिली असुन सदर गुन्हयामुळे त्यांना समाजात जिवन जगताना अपमानीत झाल्यासारखे वाटत असेल पुन्हा चांगले जिवन जगण्यासाठी गुन्हयाची पार्श्वभुमीतुन बाजुला कसे निघता येईल त्या बाबत काय करायला पाहिजे याची माहीती देवुन गुन्हेगारांना सुधारण्यासाठी योग्य ते समुपदेशन केले असुन चांगल्या कामासाठी पोलीस नेहमीच तुमच्या मदतीसाठी तयार राहतील याची त्यांना जाणीव करुन दिली व गुन्हेगारांचे वर्तनात सुधारणा होणे करीता तसेच भविष्यात त्यांनी पुन्हा गुन्हेगारीकडे वळु नये या करीता त्यांचे मनपरिवर्तन होणे करीता त्यांना योग्य ते समुपदेशन  पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यानी केले. सोबतच कायदयाचया  चाकोरीत राहूनच जिवन जगणयाचा सल्ला हजर आरोपीना कोपरगाव शहर पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी दिला.

COMMENTS