व्यापार्‍यासह ट्रकचालकास चौघांकडून मारहाण व धमकी

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

व्यापार्‍यासह ट्रकचालकास चौघांकडून मारहाण व धमकी

अहमदनगर/प्रतिनिधी - मालट्रकमधून माल खाली उतरावयाचा नाही. माल खाली उतरवला तर गाडी फोडून टाकू व तुला मारहाण करू, अशी धमकी देऊन तिघांनी शिवीगाळ केली. ही

दुधाचे दर न वाढविल्यास घालणार राडा
महसूलमंत्री थोरात म्हणाले… सामान्य जनता काँग्रेसशी निष्ठावान व प्रामाणीक
श्री स्वामी समर्थ महाराज चरित्र | Shri Swami Samarth Maharaj | LokNews24 |

अहमदनगर/प्रतिनिधी – मालट्रकमधून माल खाली उतरावयाचा नाही. माल खाली उतरवला तर गाडी फोडून टाकू व तुला मारहाण करू, अशी धमकी देऊन तिघांनी शिवीगाळ केली. ही बातमी मार्केट यार्डमधील साधना एजन्सी या दुकानासमोर घडली. याप्रकरणी परस्परविरोेधी तक्रारी दाखल झाल्याने पोलिसांनी दोन्ही बाजूंचे गुन्हे दाखल केले आहेत.
याबाबतची माहिती अशी की मार्केट यार्डमधील साधना एजन्सी या दुकानात गहू व हरभरा बियाणे घेऊन मालट्रक (क्रमांक एमएच सोळा एइ 7817) चालक गुजरात येथून माल घेऊन आला. गाडीतील माल उतरवण्यासाठी त्याने ट्रक दुकानासमोर लावला. त्यावेळी तेथे सुजीत अनिल औसरकर, अजित अनिल औसरकर (दोघे राहणार औसरकर मळा, अ.नगर), अमोल ससे (पूर्ण नाव माहीत नाही) व एक अनोळखी व्यक्ती ट्रकजवळ आले व ट्रक चालकास त्यांच्या दुकानात बोलावून घेऊन, तू ट्रकमधील माल खाली उतरवून घ्यायचा नाही, असे म्हणून शिवीगाळ केली. तू गाडीतील माल खाली उतरवून घेतल्यास तुझी गाडी फोडू व तुला मारहाण करू, अशी धमकी दिली. यावर दुकानातील प्रशांत कुलकर्णी यांनी फोन करून ऋषभ बोरा यांना बोलावून घेतले. बोरा दुकानात आल्यावर त्यांनी ट्रक चालकास माल खाली उतरवून घेण्यासाठी बोलावून घेतले असता चौघांनी ऋषभ बोरा व ट्रक चालकास मारहाण करून ट्रकमधील माल दुकानात घेण्यास अडवणूक केली व दुकानात येवून ताब्यात घेऊन दाखवतो असे धमकावले. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी ऋषभ अजय बोरा (वय 25, राहणार खिस्त गल्ली, अ.नगर) यांच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास पोलिस हवालदार देवराम ढगे करीत आहे.

COMMENTS