व्याधिमुक्त रुग्णांसाठी स्नेहदीपतर्फे परिचर्या

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

व्याधिमुक्त रुग्णांसाठी स्नेहदीपतर्फे परिचर्या

कोरोना व्याधिमुक्त रुग्णांसाठी स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्रातर्फे निवासी परिचर्या उपक्रम सुरु करण्यात आला आहे.

माजी उपमख्यमंत्री अजित पवार यांचा भाजप कार्यकर्त्यांनी अडवला ताफा.
पाथर्डी शहरात भरदिवसा धाडसी चोरी ; तालुक्यात पोलिसांचे अस्तित्व दिसेना
नगरमध्ये नव्याने जिल्हा वाहतूक शाखा स्थापन

अहमदनगर/प्रतिनिधी-कोरोना व्याधिमुक्त रुग्णांसाठी स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्रातर्फे निवासी परिचर्या उपक्रम सुरु करण्यात आला आहे. कोरोना व्याधीतून बरे झाल्यावर काही महिने रुग्णांमध्ये तीव्र अशक्तपणा असतो. अनेक कुटुंबात अशा रुग्णांची सुश्रूषा करण्याची व्यवस्था नसते. कोरोनासह कॅन्सर, डिमेन्शिया, अपघात, विविध शल्यचिकित्सा आणि वृद्धत्वसंबंधी आजाराचा सामना करणार्‍या रुग्णांसाठी  हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. 

स्नेहदीप रुग्णसेवा केंद्राने वंचित समूहातील लोकांसाठी मोफत तर आर्थिक सक्षम नागरिकांसाठी वाजवी शुल्कात येथे परिचर्या सुविधा दिल्या आहेत. मागील एक वर्षात शंभरावर रुग्णांना या केंद्राचा लाभ झाला आहे. येथे स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहेत. यासंदर्भात अधिक माहितीसाठी  9422735736 आणि 7499980845 या क्रमांकांवर संपर्काचे आवाहन केंद्रप्रमुख प्रदीप काकडे आणि सचिन काळे यांनी केले आहे. स्नेहदीप रुग्णसेवा केंद्र हे डॉ. आंबेडकर पुतळ्यामागे, नगर-पुणे रस्ता, केडगाव, अहमदनगर येथे आहे. स्नेहालय आणि स्वामी विवेकानंद विद्या प्रतिष्ठान या संस्थांच्या माजी विद्यार्थ्यांकडून ते चालवले जाते.

COMMENTS