वीज कंपन्या कर्मचार्‍यांची दिवाळी होणार दणक्यात : उर्जामंत्री राऊतांनी केला बोनस जाहीर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वीज कंपन्या कर्मचार्‍यांची दिवाळी होणार दणक्यात : उर्जामंत्री राऊतांनी केला बोनस जाहीर

मुंबई/प्रतिनिधी : महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या तीनही वीज कंपन्यांतील कर्मचार्‍यांची यंदाची दिवाळी दणक्यात होणार आहे. वीज कंपन्यांतील कर्मचार्

अमृतवाहिनीच्या डॉ लोंढे ,डॉ. चव्हाण व डॉ. गुरव यांची पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर निवड
श्रीगोंदा तालुका योग संघाच्या अध्यक्षपदी गोविंद हिरवे
“या” नगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजला

मुंबई/प्रतिनिधी : महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या तीनही वीज कंपन्यांतील कर्मचार्‍यांची यंदाची दिवाळी दणक्यात होणार आहे. वीज कंपन्यांतील कर्मचार्‍यांना बोनस मिळणार आहे. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यानुसार नियमित कर्मचार्‍यांना 12 हजार तर सहायक कर्मचार्‍यांना 7 हजार 200 रुपये बोनस मिळणार आहे.
राज्य सरकारच्या वीज कंपन्यांमधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सानुग्रह अनुदान (बोनस) देण्याचा निर्णय ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी घेतला आहे. कामगार संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. वीज कंपन्यांमध्ये वर्ग एक ते चतुर्थ श्रेणीतील सर्व अधिकारी, कर्मचारी यांना 12 हजार तर सहायक कर्मचार्‍यांना 7 हजार 200 रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल, अशी घोषणा डॉ. राऊत यांनी या बैठकीत केली.
सुरुवातीला वर्ग 1 व 2 च्या अधिकारी यांना वगळून 10 हजार सानुग्रह अनुदान देण्याचा प्रस्ताव ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी ठेवला. मात्र, कामगार संघटनांनी या प्रस्तावाशी असहमती व्यक्त करून ऊर्जामंत्र्यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली. कामगार संघटनांशी चर्चा केल्यावर व त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर डॉ. राऊत यांनी ऊर्जा विभागाच्या प्रस्तावात गेल्या वर्षीच्या दिवाळीप्रमाणे याही वर्षी सानुग्रह अनुदान देण्यात येईल अशी घोषणा केली. या बैठकीला सर्व संघटनांचे पदाधिकारी, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव वाघमारे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडख सूत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टे उपस्थित होते. कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी या बैठकीला ऑनलाईन उपस्थिती लावली.
वीज बिलाची प्रचंड थकबाकी, पाणीपुरवठा-पथदिवे यांच्याकडून न मिळालेले अर्थसहाय्य तसेच कोळसा कंपनीची थकबाकी, वीज निर्मिती करणार्‍या शासकीय व खासगी कंपन्यांची प्रलंबित देयके, कृषीपंपांची नगण्य वीज बिल वसुली इत्यादी कारणांमुळे सध्या तिन्ही कंपन्या अत्यंत बिकट अशा आर्थिक संकटातून वाटचाल करत आहे. अशा परिस्थितीत आर्थिक परिस्थितीचे भान ठेवून सानुग्रह अनुदान देण्याबाबत निर्णय घेण्यात येत आहे, असे डॉ. राऊत यांनी यावेळी सांगितले. गेल्या दीड वर्षात कोरोना साथीमुळे उद्योग धंदे व व्यवसाय दीर्घकाळ बंद राहिल्याने तिन्ही वीज कंपन्यांच्या महसुलावर अनिष्ट परिणाम झालेला आहे. यात अधिकची भर म्हणून निसर्ग व तौक्ते चक्रीवादळे, अतिवृष्टी व महापुरामुळे वीज यंत्रणेचे अपरिमित नुकसान होऊन आर्थिक स्थिती खालावलेली आहे, याकडेही त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.

अधिकारी-कर्मचार्‍यांचा गौरव
कोरोनाच्या काळात तिन्ही कंपन्यांतील अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या जीवाची बाजी लावून महाराष्ट्रातील जनतेला अखंडित वीजपुरवठा दिला तसेच महापुराच्या अभूतपूर्व संकटकाळात आपला जीव धोक्यात घालून वीज पुरवठा सुरळीत केला, अशा शब्दांत त्यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी व कामगार यांचा गौरव केला.

COMMENTS