विनेश फोगट निलंबित; भारतीय कुस्ती महासंघाची कारवाई

Homeताज्या बातम्यादेश

विनेश फोगट निलंबित; भारतीय कुस्ती महासंघाची कारवाई

नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये विनेश फोगट हिच्याकडून भारताला मोठी अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा फोल ठरली. त्यानंतर विनेश फोगटला भारतीय क

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा
टीम इंडियाला आशिया कपमधील सुपर फोरमधील सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
जावलीतील शाळांमधे ’गुढीपाडवा; पट वाढवा’ अभियानास प्रारंभ; जिल्हा परिषदेचा उपक्रम

नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये विनेश फोगट हिच्याकडून भारताला मोठी अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा फोल ठरली. त्यानंतर विनेश फोगटला भारतीय कुस्ती महासंघाने धक्का दिला आहे. कुस्ती महासंघाने विनेशचे अनिश्‍चित काळासाठी निलंबन केले आहे. विनेश फोगाटसह कुस्तीपटू सोनम मलिकलाही नोटीस पाठवण्यात आली आहे.
विनेशने भारतीय संघाचे अधिकृत स्पॉन्सर ‘शिवनरेश’ या कंपनीच्या नावाच्या जागी ‘नाईकी’ ब्रँडचे कपडे घातले होते. तसेच भारतीय खेळाडू राहत असलेल्या खेलग्राममध्ये राहण्यासही तिने नकार दिला. इतकंच नाही तर भारतीय खेळाडूंबरोबर सराव करण्यासही तिने नकार दिला होता. विनेशने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय कुस्ती महासंघाने विनेशवर निलंबनाची कारवाई केली आहे. विनेशला कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली असून या नोटीशीला 16 ऑगस्टपर्यंत उत्तर द्यावं लागणार आहे. तिने दिलेल्या उत्तरावर चर्चा करण्यात येणार आहे, तोपर्यंत तिला कोणत्याही राष्ट्रीय किंवा स्थानिक कुस्ती स्पर्धांमध्ये खेळता येणार नाही.

COMMENTS