Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विधानसभेसाठी आजपासून रणसंग्राम

मुंबई : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार आज मंगळवारी निवडणुकीची अधिसूच

दुर्दैवी! वृद्ध दाम्पत्याची आत्महत्या | LOKNews24
संजय राऊतांच्या अडचणीत वाढ
संजीवनी सैनिकी शाळेत चांद्रयान-3 मोहिमेचे जल्लोषात स्वागत

मुंबई : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार आज मंगळवारी निवडणुकीची अधिसूचना काढण्यात येणार असून, आजपासूनच अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. 29 ऑक्टोबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. तसेच मधे येणार्‍या सुट्टया ग्रहित धरल्यास उमेदवारी अर्ज दाखल करण्यास कमी दिवसांचा कालावधी मिळणार असल्याचे दिसून येत आहे. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक 4 नोव्हेंबर असल्यामुळे त्याच दिवशी लढती स्पष्ट होईल.
उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरूवात होत असली तरी, अजूनही अनेक पक्षांकडून जागावाटप अंतिम करण्यात आलेले नाही. भाजपने 99 उमेदवारांची नावे जाहीर करत त्यांना संधी दिली आहे. मात्र शिंदे आणि अजित पवार गटाने अजूनही आपल्या उमेदवारांची नावे अंतिम केलेली नाहीत. शिवाय महाविकास आघाडीमध्ये देखील तोच तिढा कायम असल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडीमध्ये जागा-वाटपांचा तिढा कायम असल्याचे दिसून येत आहे. ठाकरे गट आणि काँगे्रसमध्ये विदर्भातील जागा-वाटपांवरून चांगलाच तणाव असल्याचे दिसून येत आहे. मात्र खासदार शरद पवार यांनी मध्यस्थी करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असून, सोमवारी जयंत पाटील यांनी मातोश्रीवर भेट देऊन चर्चा केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी मंगळवारी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्याची शक्यता आहे.

COMMENTS