वापरलेले पिपीई किट कचरा कुंडीत टाकल्याने 1 लाखाचा दंड

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वापरलेले पिपीई किट कचरा कुंडीत टाकल्याने 1 लाखाचा दंड

गणेशनगर स्विमिंग टॅॅकंच्या पाठीमागे असणार्‍या महापालिकेच्या कचरा कुंडीत वापरलेले पिपीई किट फेकण्याचा प्रकार स्थानिक नागरिकांनी उघडकीस आणला.

मध्य रेल्वेवर तीन हजार नव्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची करडी नजर
राष्ट्रवादीची गृहीत धमकी, सेनेकडून उध्वस्त !
डॉ.योगेश भैय्यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी रस्त्याचा प्रश्न लावला मार्गी

शिराळा / प्रतिनिधी : गणेशनगर स्विमिंग टॅॅकंच्या पाठीमागे असणार्‍या महापालिकेच्या कचरा कुंडीत वापरलेले पिपीई किट फेकण्याचा प्रकार स्थानिक नागरिकांनी उघडकीस आणला. यानंतर महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांनी तातडीने ठिकाणी धाव घेतली. तसेच पिपीई किट टाकण्यासाठी आलेल्या आदित्य डायगनॉस्टिकला 1 लाखाचा दंड करण्याचे आदेश दिले. तसेच आयुक्त नितीन कापडणीस यांच्याशी चर्चा करून आदित्य डायगनॉस्टिकचा परवाना रद्द करण्याची कारवाई करणार असल्याचे महापौर सुर्यवंशी यांनी सांगितले.

शुक्रवारी सायंकाळी गणेशनगर येथील रोटरी क्लबच्या पाठीमागे असणार्‍या महापालिकेच्या कचरा कंटेनरमध्ये सायंकाळी सहाच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटल समोरील आदित्य डायगनॉस्टिक सेंटरची अ‍ॅम्बुलन्स मधून डायगनॉस्टिक सेंटरमध्ये वापरलेले 3 पिईपी किट व अन्य वैद्यकीय कचरा टाकण्यासाठी हे वाहन आले होती. यावेळी अ‍ॅम्ब्युलन्स चालक प्रकाश अवघडे हे कचरा टाकत असताना स्थानिक नागरिकांनी ते पाहिले. यावेळी स्थानिक नागरिकांनी विरोध करत ती अ‍ॅम्ब्युलन्स गाडी थांबवली

यानंतर स्थानिक नगरसेवक फिरोज पठाण, बिरेंद्र थोरात यांनी महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांना नागरिकांनी बोहावले महापौर सुर्यवंशी यांनी तातडीने ठिकाणी जाऊन आरोग्य निरीक्षक अंजली कुदळे यांना बोलवून संबंधित डायगनॉस्टिक सेंटरला 1 लाखाचा दंड ठोठावण्याचा आदेश दिला. तसेच मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्याशी चर्चा करून आदित्य डायगनॉस्टिकचा परवाना रद्द करण्याबाबत निर्णय घेऊ असे सांगितले. तर हा प्रकार वारंवार घडत असल्याने कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

परवाना रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार : महापौर

आदित्य डायगनॉस्टिक सेंटरकडून वापरलेले मेडिकल वेस्ट कचरा कंटेनरमध्ये टाकला जात आहे. याबद्दल 1 लाखाचा दंड ठोठावला आहे. शिवाय सोमवारी परवाना रद्द करण्याबाबत आयुक्त कापडणीस यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ. 

 महापौर दिग्विजय सूर्यवंशी सांगली.

COMMENTS