वाई नगरपरिषद व ग्रामीण रूग्णालयामध्ये समन्वयाचा अभाव ; पालिकेचे विरोधी पक्षनेते आक्रमक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाई नगरपरिषद व ग्रामीण रूग्णालयामध्ये समन्वयाचा अभाव ; पालिकेचे विरोधी पक्षनेते आक्रमक

सध्या वाई शहरात कोरोनाचा कहर वाढलेला दिसून येत आहे.

इस्लामपूर भाजपा युवा मोर्चाचे अभिजीत खडके यांचे अपघाती निधन
फुटीरतेच्या वाटेवर!
रेल्वेच्या 85 हजार कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी

वाई / प्रतिनिधी : सध्या वाई शहरात कोरोनाचा कहर वाढलेला दिसून येत आहे. वाई नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते सतिश वैराट हे स्व:त काही दिवसांपासून कोरोना लढाईत सातत्याने व प्रभावीपणे फेसबुकच्या व इतर पध्दतीने काम करत आहेत. यामध्ये त्यांनी वाईच्या मुख्याधिकार्‍यांना दिलेल्या निवासस्थानी त्या राहत नसल्याचाही भांडाफोड केला. तसेच वाई नगरपरिषदेच्या बांधकाम व आरोग्य विभागाकडे होम आयसोलेशन व कोरोनाशी संबंधीत माहिती घेण्यात येते. परंतू त्या विभागावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसून येते. बांधकाम व आरोग्य विभागात कोरोनाच्या नावाखाली लाखो रुपयांची बिले जादा दराने पदाधिकार्‍यांना कसलीही माहिती न देता कामे होतात. लोकांच्या हिताची कामे करण्यास त्यांना वेळ नाही, अशी परिस्थिती तिथे असल्याचे दिसून येत आहे. 

सतिश वैराट यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ग्रामीण रुग्णालयात कोरोनाची चाचणी केल्यानंतर रुग्ण दाखल पॉझिटिव्ह आल्यावर किंवा होम आयसोलेशन केल्यास त्याची माहिती नगरपरिषदेस द्यायला हवी आहे, परंतु तसे होत नाही. त्यामुळे माहिती मिळत नाही. त्यामुळे वैराट यांनी ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी व नगरपरिषदेच्या लोकांना याबद्दल जाब विचारला असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. ही परिस्थिती पाहता अशा वेळेस सर्वांनी समन्वयाने काम करुन कोरोनाला हरवण्यास मदत केली पाहिजे. नाहीतर वाईतील जनता यांना कधीच माफ करणार नाही, असेही वैराट यांनी सांगितले.

वाईच्या भवितव्यासाठी मुख्याधिकारी हा पालिकेने बांधलेल्या निवासस्थानी मुक्कामी हवा असल्याबाबतचे लेखी निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देणार असल्याचे वैराट यांनी यावेळी पत्रकात म्हटले आहे.

COMMENTS