वडगाव गुप्ता येथे युनियन बँक ऑफ इंडियाच्या वतीने जनसुरक्षा अभियान संपन्न

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वडगाव गुप्ता येथे युनियन बँक ऑफ इंडियाच्या वतीने जनसुरक्षा अभियान संपन्न

नगर -  युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेच्या वतीने वडगाव गुप्ता येथील शाखेमध्ये जनसुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान

रोटरी क्लब शेवगाव आयोजित सूर नवा ध्यास नवा दिवाळी पहाट कार्यक्रम संपन्न
वित्त आयोग निधी अपहारप्रकरणी सरपंचासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
नऊ दुर्गांनी केला मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प

नगर – 

युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेच्या वतीने वडगाव गुप्ता येथील शाखेमध्ये जनसुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्षेत्रीय प्रमुख अभिषेक जैन यांनी उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन केले.

वडगाव गुप्ता गावातील ग्रामस्थांना बँकेच्या वतीने प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना व अटल पेन्शन योजना या योजनांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या अभियानप्रसंगी वडगाव गुप्ताचे लोकनियुक्त सरपंच विजयराव शेवाळे, अशोकराव गुडगळ, पंचायत समितीचे सदस्य गुलाब शिंेदे, युनियन बँकेचे ऋण विभागप्रमुख ज्ञानेश्‍वर साळुंके, कृषी विभागप्रमुख सचिन शिरसाठ आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बँकेचे वनश्री मजगवरे यांनी केले, तर आभार शाखाधिकारी किरण शिंदे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिनेश देशमुख, राजेंद्र खामकर, रामेश्‍वर बोडके, रंगनाथ गव्हाणे आदींनी परिश्रम घेतले. उपस्थितांनी विविध योजनांविषयी माहिती घेऊन आपल्या शंकाकुशंकाचे निरसन करून घेतले.

COMMENTS