वंचितांची दिवाळी साजरी होणार विविध कार्यक्रमांनी… विविध खेळ, स्पर्धा, दीपोत्सव व आतषबाजीची धमाल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वंचितांची दिवाळी साजरी होणार विविध कार्यक्रमांनी… विविध खेळ, स्पर्धा, दीपोत्सव व आतषबाजीची धमाल

अहमदनगर (प्रतिनिधी)-  लायन्स क्लब ऑफ अहमदनगर यांच्या वतीने सलग तेराव्या वर्षी शहरातील विविध स्वयंसेवी संस्थांच्या अनाथ, अपंग, वंचीत, निराधार मुलां

अबब…नगरच्या पोलिसांनी केला एक टन गांजा नष्ट…
मनसे संचलित लताई कोविड सेंटर आज पासून बंद ! l LokNews24
अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्काराने वसंत रांधवण सन्मानित

अहमदनगर (प्रतिनिधी)- 

लायन्स क्लब ऑफ अहमदनगर यांच्या वतीने सलग तेराव्या वर्षी शहरातील विविध स्वयंसेवी संस्थांच्या अनाथ, अपंग, वंचीत, निराधार मुलांसाठी दीपोत्सव 2021 या दिवाळी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा स्नेहालय येथे रविवार दि.7 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये मराठी सिने कलाकार स्मिता ओक व जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील सहभागी होणार असल्याची माहिती लायन्सचे अध्यक्ष डॉ. अमित बडवे यांनी दिली.

दिवाळी मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून लायन्सचे रिजन चेअरमन संतोष माणकेश्‍वर, झोन चेअरमन एकनाथ गोंदकर, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष हनिफ शेख उपस्थित राहणार आहेत. मागील बारा वर्षात लायन्स क्लबचे सदस्य, विविध सेवाभावी संघटना, दानशूर व्यक्तींच्या सहकर्याने वंचित मुलांसमवेत दिवाळी साजरी केली जाते. घरच्या दिवाळीपेक्षा अधिक उत्साहपुर्ण वातावरणात हा मेळावा पार पाडत असतो. लहान मुले-मुली देखील या क्षणाचा आतुरतेने वाट पाहत असतात. दुपारी 4 वाजता या मेळाव्यास प्रारंभ होणार असून, मुलांना विविध खेळ, स्पर्धा, नृत्य, आर्केस्ट्रा, संगीताची धमाल, गिफ्ट, आतिषबाजी, खाण्यासाठी विविध स्वादिष्ट पदार्थ व भोजनाची मेजवाणी मिळणार आहे. यावेळी मुलांसह दीपोत्सव साजरा करुन संपुर्ण परिसर पणत्यांच्या प्रकाशाने झगमगणार आहे.

वंचित घटकातील मुलांच्या जीवनात हास्य व आनंद फुलवण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, वंचित मुलांच्या दिवाळी कार्यक्रमासाठी व्यक्तीगत स्वरुपात देखील मदत देऊन वंचितांची दिवाळी गोड करण्याचे आवाहन लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. अमित बडवे, सचिव सुनील छाजेड, खजिनदार विपुल शाह, प्रकल्पप्रमुख सुधीर लांडगे, दिलीप कुलकर्णी, प्रणिता किरण भंडारी यांनी केले आहे. या उपक्रमास सहआयोजक म्हणून स्नेहालयचे सहकार्य लाभत असून, दीपोत्सव कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हरजितसिंह वधवा, धनंजय भंडारे, अरविंद पारगावकर, किरण भंडारी, विजय कुलकर्णी, डॉ.सिमरन वधवा, डॉ.मिरा बडवे, प्रशांत मुनोत, जस्मित वधवा, राजबीरसिंग संधू, कमलेश भंडारी, सुधीर लांडगे, डॉ. संजय असणानी, संदेश कटारिया आदी प्रयत्नशील आहेत.

COMMENTS