लौकीत नागरीकांचे कोरोना लसीकरण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लौकीत नागरीकांचे कोरोना लसीकरण

कोपरगाव प्रतिनिधी -संपुर्ण कोपरगाव तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण अभियान जोरदार सुरु असुन त्याचाच एक भाग म्हणुन तालुक्यातील पुर्व भागात असलेल्या ल

राज्यात मान्सूनला ब्रेक ; पेरण्या रखडल्या
तुमचे आजचे राशीचक्र बुधवार, २१ जुलै २०२१ l पहा LokNews24
कर्जत तालुक्यातील खेड गावामधील गरीब कुटुंबातील मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांना गावगुंडाकडून मज्जाव.

कोपरगाव प्रतिनिधी -संपुर्ण कोपरगाव तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण अभियान जोरदार सुरु असुन त्याचाच एक भाग म्हणुन तालुक्यातील पुर्व भागात असलेल्या लौकी गावात तालुका आरोग्य विभागाच्या वतीने बुधवारी लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यात अठरा वर्षापुढील एकुण १५५ नागरीकांचे लसीकरण करण्यात आले. या लसीकरण अभियाना दरम्यान मोठ्या प्रमाणात  नागरिकांनी  लसीकरण करून घेतले . गावातच लसीकरण कॅम्प आयोजित केल्यामुळे नागरिकांना बाहेरगावी जाऊन  लस घेण्याचा त्रास कमी झाल्या मुळे नागरीकांनी समाधान व्यक्त केले. कॅम्प आयोजित करण्यासाठी गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, कोरोना विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ वैशाली बडदे यांच्या  मार्गदर्शनाने आयोजित लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब अडसरे, डॉ. प्रज्ञा भगत तसेच आरोग्य सेविका बबिता परमाल,निर्मला डोंगरे, अनिल बनसोडे , मनिषा त्रिभुवन ,चंद्रकला गुंजाळ आदी आरोग्य कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.  याप्रसंगी सरपंच-चांगदेव  इंगळे, उपसरपंच-जयश्री वलटे ग्रामविकास अधिकारी-मेहेरे पी एम अंगणवाडी सेविका सौ रुपाली भवर, ग्रामपंचायत कर्मचारी विलास इंगळे, सुजित कदम आदी उपस्थित होते. तसेच प्रत्येक नागरिकाने लस घ्यावी असे आवाहन ग्रामपंचायत मार्फत करण्यात आले..

COMMENTS