चेहरा सुंदर बनवण्यासाठी महिला मेकअप करतात . परंतु मेकअप मध्ये वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांचे काही साइड इफेक्ट्स देखील होतात . ज्यामुळे तुमच्या सौंदर्य
चेहरा सुंदर बनवण्यासाठी महिला मेकअप करतात . परंतु मेकअप मध्ये वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांचे काही साइड इफेक्ट्स देखील होतात . ज्यामुळे तुमच्या सौंदर्यावर परिणाम होतो . लिपस्टिक हे देखील असेच एक उत्पादन आहे , ज्याच्या अतिवापराने ओठांचा रंग काळा होऊ शकतो. प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी काळ्या ओठांची समस्या असते आणि याची अनेक कारणे असू शकतात. जीवनशैलीच्या अनेक सवयी आणि काही आजारांमुळे ओठांचा रंग बदलतो . दरम्यान, ओठ काळे होण्यामागे इतर कारणे असू शकतात जसे की धूम्रपान, औषधांचे साईड इफेक्ट, ऍलर्जी, सर्दी, जीवनसत्त्वांची कमतरता, रक्तातील साखरेची पातळी कमी होणे इत्यादी जर तुमच्या ओठांचा रंग देखील काळा झाला असेल तर येथे काही घरगुती उपाय आहेत जे तुमची समस्या दूर करण्यात मदत करू शकतात.

1.ओठांना स्क्रब करा
गडद ओठांचा रंग परत येण्यासाठी वेळोवेळी ते स्क्रब करणे आवश्यक आहे. जेणेकरून ओठांची मृत त्वचा काढता येईल यासाठी तुम्ही मध(Honey) आणि बदामाचे तेल(Almond oil) समान प्रमाणात घ्या आणि त्यात थोडी साखर(Sugar) मिसळा ते ओठांवर लावा आणि हळू हळू स्क्रब करा . यामुळे तुमचे ओठ मऊ होतील आणि त्यांच्या रांगवरही चांगला परिणाम होईल

२. झोपताना क्रीम लावा .
असं म्हणतात की झोपताना क्रीम लावलं तरी ओठांच्या रंगावर खूप परिणाम होतो क्रीममुळे ओठांचा रंग गुलाबी तर होतोच, पण ओठ मऊही होतात. रोज रात्री क्रीमने मसाज केल्याने तुम्हाला काही वेळात फरक दिसेल.

३. भरपूर पाणी प्या .
तुम्ही पुरेसे पाणी प्यायले नाही तरी तुमच्या ओठांचा रंग निघून जातो. ओठ कोरडे आणि निर्जीव दिसतात. त्यामुळे त्यांना हायड्रेट ठेवणे फार महत्वाचे आहे यासाठी तुम्ही भरपूर पाणी प्या.

ओठ कोरडे आणि निर्जीव दिसतात .
४. धूम्रपान सोडणे .
तुम्ही धूम्रपान करत असाल तर ही सवय लवकर सोडा अन्यथा तुमचे उपाय कधीही त्यांचे काम पूर्ण करू शकणार नाहीत. याशिवाय चांगल्या दर्जाची लिपस्टिक लावा.

COMMENTS