लसीकरण डिसेंबरअखेर पूर्ण होण्याच्या सरकारच्या थापा : सायरस पुनावाला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लसीकरण डिसेंबरअखेर पूर्ण होण्याच्या सरकारच्या थापा : सायरस पुनावाला

पुणे/प्रतिनिधी- देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतांनाच, कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता लसीकरणाचा वेग वाढवण्याची मागणी करण

पाण्याचा अंदाज न आल्याने विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू
कपिल शर्मा लवकरच नवीन चित्रपटात
स्कूल बस चालकानं रेल्वे फाटक तोडत थेट बस रुळावरून नेली.

पुणे/प्रतिनिधी- देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतांनाच, कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता लसीकरणाचा वेग वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र केंद्र सरकारच्या अपयशी धोरणांमुळे लसीकरणाचा बोजवारा उडाला आहे. केंद्र सरकार संपूर्ण देशभरात डिसेंबरअखेर लसीकरण पूर्ण होईल अशा वल्गना केल्या होत्या. मात्र केंद्र सरकारच्या या थापा असून, डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण होण्याची शक्यता पुण्यातील ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे अध्यक्ष सायरस पूनावाला यांनी फेटाळली आहे. पुण्यामध्ये एका कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.
कोरोना आणि लसीकरण यावर पुनावाला यांनी या कार्यक्रमात सविस्तर भाष्य करत, केंद्र सरकारचे कान देखील यावेळी टोचले. को व्हॅक्सीन आणि कोविशिल्डचे कॉकटेल करणे चुकीचे असल्याचे मतही पूनावाला यांनी व्यक्त केले. डिसेंबर अखेरीस लसीकरण होईल आणि सप्टेंबर पर्यंत 45 कोटी लस मिळतील असे सांगितले जात आहे. त्यावर पूनावाला म्हणाले की, राजकारणी लोक हेच थापा मारतात, आम्ही महिन्याला 10 कोटी लसींचं उत्पादन घेतलं आहे. हे काही सोपे काम नाही. यामध्ये कोट्यावधी रूपयांची गुंतवणूक केली आहे. आम्ही महिन्याला 10 कोटी प्रमाणे वर्षाला 110 ते 120 कोटी होईल. तसेच इतर कंपन्यांच्या आकडेवारीवरून देखील स्पष्ट होईल की किती लस उपलब्ध होईल. मृत्यूदर कमी असल्याने लॉकडाउन लावला जाऊ नये असंही पूनावाला म्हणाले. 150 देश लसीची वाट पाहात असून मोदी सरकारने लसींच्या निर्यातीला परवनगी द्यायला हवी, अशी मागणीही पूनावाला यांनी केली आहे.

18 वर्षाखालील मुलांना कोविशिल्ड देणे धोकादायक
कोरोनाचे नव-नवे व्हेरियंट समेार येत असून, याचा सर्वाधिक धोका लहान मुलांना आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि तज्ज्ञांचा गट लहान मुलांना लस देण्याचा विचार करत आहे. मात्र याविषयी बोलतांना पूनावाला म्हणाले की, 18 वर्षांखालील मुलांना कोविशिल्ड देणार नाही. ते धोकादायक आहे.

COMMENTS