लसीअभावी शहरातील ३० केंद्र बंद

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लसीअभावी शहरातील ३० केंद्र बंद

राज्य शासनाकडून उपलब्ध झालेल्या लसींच्या आधारावर पुणे शहरातील लसीकरण केंद्र सुरू झाली़ मात्र, १७२ लसीकरण केंद्रांपैकी अनेक केंद्रांवर लस संपल्याने लसीकरणाचे काम आटोपते घ्यावे लागले़ तर ३० केंद्रांवरील लसीकरणाचे काम आज पूर्णत: बंद होते़.

 खासगीकरणा विरोधात वीज कर्मचारी आक्रमक 
नांदेड घटनेत चौकशीअंती दोषींवर कारवाई
देवळाली प्रवरामध्ये चक्क पाळीव कुत्र्याचा केला दशक्रियाविधी

पुणे : राज्य शासनाकडून उपलब्ध झालेल्या लसींच्या आधारावर पुणे शहरातील लसीकरण केंद्र सुरू झाली़ मात्र, १७२ लसीकरण केंद्रांपैकी अनेक केंद्रांवर लस संपल्याने लसीकरणाचे काम आटोपते घ्यावे लागले़ तर ३० केंद्रांवरील लसीकरणाचे काम आज पूर्णत: बंद होते़. 

दरम्यान, राज्य शासनाकडून महापालिकेकडे लस प्राप्त झाल्या नसल्याने, १७२ पैकी किती लसीकरण केंद्र सुरू होणार व ती किती वेळ कार्यरत राहणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे़. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडील नोंदीनुसार महापालिकेच्या साठ्यात सद्यस्थितीला केवळ १९० डोस शिल्लक आहेत़ तर शुक्रवारी दिवसभरात दीड हजार डोस वितरित करण्यात आले आहेत़ परंतु, काही खासगी रूग्णालयांनी तथा महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर मिळून साधारणत: दहा हजार लस यापूर्वी घेतलेल्या आहेत़ त्यामुळे शनिवारी काही प्रमाणात मोजक्या लसीकरण केंद्रांवर शंभर पेक्षा अधिक जणांना लस मिळण्याची शक्यता आहे़. 

COMMENTS