लग्नाची वरात पाहणार्‍या तरुणावर खुनी हल्ल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लग्नाची वरात पाहणार्‍या तरुणावर खुनी हल्ल

पुणे / प्रतिनिधीः लग्नाची वरात पाहत असलेल्या तरुणावर पूर्ववैमनस्यातून सुर्‍याने भोसकून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. 

विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक !
 जामखेडमध्ये घरफोडी – लाखोंचा ऐवज लंपास
नेवाश्यात अवैध वाळू वाहतूकीवर कारवाई

पुणे / प्रतिनिधीः लग्नाची वरात पाहत असलेल्या तरुणावर पूर्ववैमनस्यातून सुर्‍याने भोसकून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. 

रफिक इब्राहिम पानसरे (वय 50, रा. सांगरुन, ता. हवेली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. ही घटना 12 जून रोजी मध्यरात्री सव्वा बारा वाजता सांगरुन गावात घडली. याप्रकरणी साहिल पानसरे (वय 21, रा. सांगरुन, ता़ हवेली) यांनी उत्तमनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल याचे वडिल सादिक पानसरे व रफिक पानसरे हे एकमेकांचे नातेवाइक आहेत. सादिक आणि रफिक यांचे जुन्या दर्ग्याच्या देखभालीवरून वाद आहेत. तसेच साहिल यांच्या बहिणीला दोन वर्षांपूर्वी रफिकने शिवीगाळ केली होती. यावरून त्यांच्यात वाद होता. सांगरुन गावात 12 जून रोजी मध्यरात्री लग्नाची वरात सुरू होती. सर्व जण तेथे थांबून वरात बघत होते. या वेळी रफिक हा हातात सुरा घेऊन आला. त्याने सादिक याला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या पोटात व पाठीत सुर्‍याने भोसकले. त्याला गंभीर जखमी केले. उत्तमनगर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून रफिक पानसरे याला अटक केली आहे.

COMMENTS