रुग्णांच्या औषधोपचारासाठी योग्य ते नियोजन करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रुग्णांच्या औषधोपचारासाठी योग्य ते नियोजन करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

जिल्ह्यात भयानक स्थिती, पण सरकारचे दुर्लक्ष ; माजी मंत्री शिंदेंचा आरोप
डंपरच्या धडकेत गरोदर महिलेचा पोट फुटून अर्भक रस्त्यावर.
30 एप्रिलपर्यंत सरसकट संपूर्ण बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय

सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रशासनाला अलर्ट करा, कोणतीही व्यक्ती औषोधोपचारापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या, त्यासाठी योग्य ते नियोजन करा, अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिल्या.

विश्रामगृह सातारा येथे कोरोना संसर्गाबाबतचा आढावा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये उपस्थित होते.

सातारा जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पुरवठा झाला आहे. लसीकरणाची मोहिम गतीने राबवावी. तसेच रेमडीसीवीर औषधाचा तुटवडा भासणार नाही याचेही नियोजन करावे. तसेच कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या पाहता कोरोना रुग्णालयामध्ये बेडची क्षमता वाढवावी. याबरोबर अधिकच्या सुविधा वाढविण्यावर भर देण्यात यावा, अशा सूचना ना. पाटील यांनी बैठकीत दिल्या.

COMMENTS