पहिल्या टप्यामध्ये एकूण 19 संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू देवळाली प्रवरा /राजेंद्र उंडे कोरोना कालखंडामध्ये मुदत संपलेल्या राहुरी तालुक्या
देवळाली प्रवरा /राजेंद्र उंडे
कोरोना कालखंडामध्ये मुदत संपलेल्या राहुरी तालुक्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम निबंधक कार्यालयातून जाहिर करण्यात आला आहे. 6 टप्यापैकी पहिल्या टप्यामध्ये टाकळीमिया, मोरवाडी, केंदळ खुर्द, चिखलठाण येथील सेवा संस्थांसह 9 पतसंस्थांसह ड वर्गातील 3 संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रक्रिया सुरू झालेली आहे. तसेच निंभेरे, चंडकापूर, अंमळनेर विविध कार्यकारी सेवा संस्थांच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत.
राहुरी तालुक्यातील टाकळीमिया विविध कार्यकारी सेवा संस्था, मोरवाडी विविध कार्यकारी सेवा संस्था, गुरूदत्त विविध कार्यकारी सेवा संस्था व चिखलठाण विविध कार्यकारी सेवा संस्थेच्य निवडणुकीची जय्यत तयारी सुरू झालेली आहे. कोरोना कालखंडापूर्वी संबंधित संस्थांच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र भरण्यास प्रारंभ झाला होता. परंतु ऐनवेळी कोरोनाची परिस्थिती पाहता निवडणूकांना स्थगिती देण्यात आली होती. संबंधित संस्थांच्या मतदार याद्या जैसे थै ठेवत अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.
28 सप्टेंबर पासून तीन संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करावी यासाठी निवडणूक विभागाकडे सविस्तर माहिती पाठविण्यात आली असल्याची माहिती सहायक निबंधक नागरगोजे यांनी दिली आहे. दरम्यान, ब वर्गातील मोरवाडी, टाकळीमिया, केंदळ खर्द व चिखलठाण यांसह क वर्गातील अभिनव ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था वळण, जिजामाताई (साई समुद्धी) ग्रामिण बिगरशेती पतसंस्था सात्रळ, भाग्यलक्ष्मी ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था बारागाव नांदूर, व्यंकटेश नागरी सहकारी के्रडिट को. ऑप. सोसा. राहुरी, मातोश्री ग्रामिण बिगरशेती सह.पतसंस्था, बारागाव नांदूर, कृषि कामगार सह. सेवक पतसंस्था, कृषि विद्यापीठ (जिल्हास्तरावर) सौ. भागिरथीबाई तनपुरे प्राथमिक शहर सह. ग्राहक भांडार मर्या. राहुरी, पद्मभुषण ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. तांदूळवाडी तर ड वर्गातील उर्मी अभिनव औद्योगिक सहकारी संस्था राहुरी, देवळाली प्रवरा अभिनव औद्योगिक सहकारी मर्या. तुळजाभवानी अभिनव औद्योगिक सहकारी संस्था सात्रळ यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम सुरू झाला आहे.
राहुरी तालुक्यातील सहकार क्षेत्रातील 16 संस्थांच्या निवडणुकांबाबत मतदारांच्या प्रारूप याद्या मागविण्यात आलेल्या आहेत. अंतिम याद्या प्रसिद्ध होऊन निवडणूक विभागाच्या निर्देशानुसार संबंधित संस्थांच्या निवडणुकांबाबत प्रक्रिया पूर्ण करून घेतली जाणार असल्याची माहिती निबंधक कार्यालयातील नामदेवराव खंडेराय यांनी दिली आहे.
कोरोना कालखंडामध्ये मुदत संपलेल्या एकूण 120 संस्था आहे. टप्यानुसार सर्व संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये निंभेरे, चंडकापूर, अंमळनेर विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या निवडणुका या कोरोना कालखंडापूर्वी सुरू होत्या. त्यावेळी नामनिर्देशनही सुरू होते. नामनिर्देशनासाठी दोन दिवसाची मुदत असतानाच कोरोनाची परिस्थिती पाहून निवडणुकांना स्थगिती देण्यात आली. संबंधित संस्थांच्या निवडणुकांबाबत परिस्थिती जैसे थे ठेवत नामनिर्देशन सुरू झाल्याची माहिती खंडेराय यांनी दिली आहे.
सन 2021-22 या कालखंडामध्ये निवडणुकांचा धडाका सुरू होणार आहे. राहुरी नगरपरिषद, डॉ. तनपुरे कारखाना जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती या महत्वाच्या निवडणुका आगामी वर्षापर्यंत होणार आहे. त्यापूर्वी सहकार क्षेत्रातील निवडणुका होत असल्याने गाव पुढार्यांसाठी सहकार क्षेत्रात ठसा उमटवित वरिष्ठ राजकीय नेत्यांचे लक्ष वेधण्याची संधी गाव पुढार्यांना मिळणार आहे. गावातील सहकार क्षेत्रातील धुराडे पेटल्यानंतर आगमी निवडणुकांपूर्वी रंगित तालीम होणार आहे.
COMMENTS