राष्ट्रीय महामार्गावर झाड पडल्याने दुचाकीवरील दोनजण जखमी

Homeमहाराष्ट्रसातारा

राष्ट्रीय महामार्गावर झाड पडल्याने दुचाकीवरील दोनजण जखमी

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वळसे गावच्या हद्दीतील हॉटेल इंद्रप्रस्थच्या समोर चारचाकी व एका दुचाकीवरून प्रवास करणार्‍या वाहनचालकांच्यावर एक भलेमोठे वडाचे झाड पडल्यामुळे दोनजण जखमी झाले आहेत.

उत्तरप्रदेशात दुसर्‍या कॅबिनेट मंत्र्याचा राजीनामा | DAINIK LOKMNTHAN
Ahmednagar : शेवगाव रोडवर दरोडा | LOKNews24
रझा अकादमीवर बंदी घाला, पदाधिकाऱ्यांना तातडीने अटक करा – नितेश राणे

राष्ट्रीय महामार्गावर झाड पडल्याने दुचाकीवरील दोनजण जखमी ः तीन तास वाहतूक बंद

कराड / प्रतिनिधी : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वळसे गावच्या हद्दीतील हॉटेल इंद्रप्रस्थच्या समोर चारचाकी व एका दुचाकीवरून प्रवास करणार्‍या वाहनचालकांच्यावर एक भलेमोठे वडाचे झाड पडल्यामुळे दोनजण जखमी झाले आहेत. शैलेश भोसले (वय :35), महेश भास्कर (वय : 32, दोघे रा. रंकाळा, कोल्हापूर) अशी दुचाकीवरून प्रवास करणार्‍या जखमीची नावे आहेत. तर महाकाय वृक्ष पडल्यामुळे तीन तास वाहतूकींचा खोळंबा उडाला होता.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, वळसे गावच्या हद्दीतील हॉटेल इंद्रप्रस्थच्या समोर एक भलेमोठे वडाचे झाड महामार्गावर पडले. यावेळी महावितरणची असलेली लाईन तुटली आणि मोठ्या प्रमाणावर बराच वेळ वाहतूक विस्कळीत झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. रविवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास एका दुचाकीवरून दोघेजण प्रवास करत होते. त्याचवेळी महामार्गावर चारचाकी गाडीने प्रवास करत होते. यावेळी चारचाकी गाडीमधील कोणीही जखमी झाले नाही.

घटनेची माहिती मिळताच हायवे हेल्पलाईन इनचार्ज दस्तगीर आगा यांच्या टीमने तसेच महामार्ग वाहतूक केंद्र कराड येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक अस्मिता पाटील, सहाय्यक फौजदार राजू बागवान, पो. ना. वैभव पुजारी, रुपेश कारंडे, रायसिंग घोरपडे, देवदत्त शेडगे, हायवे मृत्यूजय दूत नागठाणे पिंटू सुतार, सोहेल सुतार बोरगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमींना बाजूला काढून सुमारे दोन तास विस्कळीत झालेली सर्व वाहतूक सेवारस्त्यावरून चालू केली. तद्नंतर महाकाय असणार्‍या वडाच्या झाडास रस्त्यावरून बाजूला काढण्यासाठी नागठाणे क्रेन बोलविण्यात आली. त्याचबरोबर दोन कटर बोलावून महाकाय वटवृक्षाच्या फांद्या कापून संपूर्ण झाड क्रेनच्या साहाय्याने बाजूला काढून संपूर्ण महामार्ग मोकळा करण्यास सुमारे तीन तासाचा कालावधी लागला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

COMMENTS