राज ठाकरेंच्या मनसेला ‘अच्छे दिन’… युवा शिवसैनिकांचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज ठाकरेंच्या मनसेला ‘अच्छे दिन’… युवा शिवसैनिकांचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’

प्रतिनिधी : मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला. आज मुंबईतील विविध भागांतील असंख्य युव

भाजपचा राष्ट्रवाद फोडा आणि राज्य करा : डॉ. मनमोहन सिंग यांची टीका | DAINIK LOKMNTHAN
पीक विमा भरण्यास मुदतवाढ द्या- आ.संदीप क्षीरसागर
राजमाता जिजाऊ स्वराज्याच्या प्रेरणापीठ ः आ.आशुतोष काळे

प्रतिनिधी : मुंबई

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला. आज मुंबईतील विविध भागांतील असंख्य युवा शिवसैनिकांनी मनसेचा झेंडा हाती घेऊन पक्षप्रवेश केला. 

आज सकाळी मुंबईतील मीरा-भाइंदर, चांदीवळी येथील असंख्य शिवसैनिक मनसेत प्रवेश करण्यासाठी राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी पोहचले होते. 

त्यानंतर राज ठाकरे यांनी सगळ्यांचे स्वागत करून त्यांना पक्षात घेतले. तसेच मीरा-भाइंदर शहरातील डॉक्टर व वकिलांनीही मनसेत प्रवेश केला. 

हा पक्षप्रवेश मनसेचे नेते अविनाश जाधव, मनसेचे मीरा-भाइंदर शहर अध्यक्ष हेमंत सावंत आणि कामगार सेना उपाध्यक्ष संदीप राणे यांच्या पुढाकाराने करण्यात आला.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. त्यातच शिवसेनेने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी जय्यत तयारी केली असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या निवडणुकीची जबाबदारी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर सोपवण्याची शक्यता आहे. 

आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढल्यास शिवसेनेला मोठे यश प्राप्त होईल, असा दावा शिवसेनेचे नेते करत आहेत.

COMMENTS